Home > Fact Check > Fact Check : सोन्याची चैन देऊन भुपेश बघेल यांनी काँग्रेस नेत्यांचे स्वागत केले का?

Fact Check : सोन्याची चैन देऊन भुपेश बघेल यांनी काँग्रेस नेत्यांचे स्वागत केले का?

24 फेब्रुवारी रोजी झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी आलेल्या नेत्यांचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी सोन्याची चैन देऊन स्वागत केल्याचा दावा करत व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. पण खरंच छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी सोन्याची चैन देऊन काँग्रेस नेत्यांचे स्वागत केले का? जाणून घेण्यासाठी वाचा फॅक्ट चेक....

Fact Check : सोन्याची चैन देऊन भुपेश बघेल यांनी काँग्रेस नेत्यांचे स्वागत केले का?
X



24 फेब्रुवारी रोजी काँग्रेसचे 85 वे राष्ट्रीय अधिवेशन (85 th National session of Congress) छत्तीसगडमधील नव्या रायपूरमधील (Raipur) टूटा जवळ राज्योस्तव मैदानात आयोजित केले होते. या अधिवेशनासाठी देशभरातून आलेल्या काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांसोबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun kharge), राहुल गांधी (Rahul gandhi), सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) उपस्थित होते. या अधिवेशनासाठी वेगवेगळ्या भागातील 15 हजार सदस्यांनी भाग घेतला होता. मात्र या अधिवेशनाचा संदर्भ देत एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल (Bhupesh Baghel) यांनी सोन्याची चैन देत काँग्रेस नेत्यांचे स्वागत केल्याचा दावा करण्यात आला आहे.

ट्विटर वापरकर्ते अनुप कुमार (Anup kumar) यांनी हाच दावा करीत हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. तर हे फॅक्ट चेक (Fact Check) करुस्तोवर हा व्हिडीओ 2 हजार 388 लोकांनी पाहिला आहे.

आणखी एक ट्विटर वापरकर्ता असलेल्या @HiNdU05019434 यांनीही असाच दावा करत हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. हा व्हिडीओसुध्दा तीन हजार लोकांनी पाहिला आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये हा व्हिडीओ अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. मात्र यानंतर पहिल्यांदा ट्वीट करणाऱ्या वापरकर्त्याने हे ट्वीट डिलीट केले. परंतू या ट्वीटचे स्क्रीनशॉट पुढे देण्यात आले आहेत.
















सत्य पडताळणी (What is Fact)

या अधिवेशनाशी संबंधित काही की- वर्ड्स सर्च केले असता त्यामध्ये अल्ट न्यूजला इंडियन एक्सप्रेसची एक बातमी मिळाली. त्यामध्ये व्हायरल व्हिडीओ दिसत आहे. या व्हिडीओत मुख्यमंत्री भुपेश बघेल हे काँग्रेस नेत्यांना माळ घालून स्वागत करताना दिसत आहेत.

ही माळ सोन्याची (Gold Chain) आहे का? हे जाणून घेण्यासाठी अल्ट न्यूजने AICC च्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य मनिष खंडूरी (Manish Khanduri) यांना संपर्क केला. यावेळी मनिष खंडूरी यांनी सांगितले की, छत्तीसगडमधील आदिवासी जनजातींनी विशेष पानांचा वापर करून या माळा बनवल्या होत्या. मात्र सध्या सोशल मीडियावर सोन्याच्या माळा असल्याचा करण्यात येत असलेला दावा निराधार असल्याचेही यावेळी मनिष खंडूरी यांनी सांगितले.

आणखी काही की- वर्ड सर्च केल्यानंतर नवभारत टाईम्सची (Navbharat Times) बातमी मिळाली. त्यामध्ये काँग्रेसच्या नेत्यांना देण्यात येणाऱ्या माळांसंदर्भात रिपोर्ट करण्यात आला आहे. त्यामध्ये या माळा अभुजमाढच्या जंगली भागातील कांकोर जिल्ह्यातील बस्तरमधील आदिवासी भागातील बांसच्या झाडापासून बनवण्यात आल्याचे म्हटले आहे.

नवभारत टाइम्सचे एक पत्रकार असलेले सोमेश पटेल (Journalist Somesh patel) यांनी एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. त्यामध्ये भुपेश बघेल यांनी माळा संबंधित बांधण्यात आलेल्या अटकळी फेटाळून लावल्या. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, या माळा आदिवासींनी विशेष पानं आणि गवतापासून तयार केल्या आहेत. यावेळी भुपेश बघेल म्हणाले, फुलांचे हार हे कुठेही पहायला मिळतात. त्यामुळे स्वदेशी जनजातीद्वारे तयार करण्यात आलेल्या माळा काँग्रेसच्या नेत्यांचे स्वागत करण्यासाठी वापरण्यात आल्या.

काय आहे सत्य? (What is Reality ?)

वरील सर्व बाबी लक्षात घेतल्या तर भुपेश बघेल यांनी काँग्रेस नेत्यांचे स्वागत करण्यासाठी सोन्याच्या माळा दिल्याचा दावा खोटा आहे. या सोन्याच्या माळा नसून स्थानिक जनजातींनी बनवलेल्या झाडांच्या पानांच्या माळा असल्याचे स्पष्ट होत आहे. यासंदर्भात छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल, वेगवेगळे न्यूज रिपोर्ट आणि काँग्रेस नेत्यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे.

Updated : 7 March 2023 6:39 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top