Home > Fact Check > ब्रिटनच्या निवडणूकीत केजरीवाल यांचा डंका?

ब्रिटनच्या निवडणूकीत केजरीवाल यांचा डंका?

ब्रिटनच्या निवडणूकीत केजरीवाल यांचा खरंच डक्का वाजवतोय का? केजरीवाल यांनी केलेल्या दाव्याचे सत्य काय आहे?

ब्रिटनच्या निवडणूकीत केजरीवाल यांचा डंका?
X

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक रिपोर्ट शेअर केला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये दिसली केजरीवाल मॉडेलची झलक. News24india.org या संस्थेने प्रसिध्द केलेल्या रिपोर्टमध्ये ब्रिटनचे पंतप्रधान पदाचे उमेदवार ऋषी सुनक यांच्या निवडणूक प्रचारातील आश्वासनांची तुलना केजरीवाल यांनी दिलेल्या आश्वासनांशी केली. तसेच ऋषी सुनक यांनी ब्रिटनमधील उर्जा संकटाचा सामना करण्यासाठी मदत म्हणून जास्तीचे पैसे देण्याचे आश्वासन दिले. अशाच प्रकारे अरविंद केजरीवाल यांनीही दिल्ली आणि पंजाबच्या विधानसभा निवडणूकातही मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले होते.

अरविंद केजरीवाल यांनी फेसबुक आणि ट्वीटरवर ही लिंक शेअर केली आहे. (अर्काइव्ह लिंक)


हा रिपोर्ट आम आदमी पक्षाच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरूनही ट्वीट करण्यात आला आहे.



प्रो बीजेपी प्रोपगंडा अकाऊंट @politicalkida ने News24india.org च्या पेजचे एक इन्फोग्राफिक्स शेअर केले आहे. यामध्ये आपच्या कार्यकर्त्या डिंपल शर्मा यांना या पेजच्या क्रिएटर दाखवले आहे. @politicalkida ने सांगितले की News24india ही आम आदमी पक्षाची प्रोपगंडा वेबसाईट आहे. या ट्वीटला 2 हजार लाईक्स मिळाले आहेत. काही माध्यमांनीही न्यूज 24 इंडियाच्या रिपोर्टला अप्रामाणिक असल्याचे सांगत त्याचा संबंध आम आदमी पक्षाशी जोडला आहे. ( पहिला, दुसरा, तिसरा, चौथा)



लेखाचे विश्लेषण

न्यूज 24 इंडियाच्या पहिल्या तीन ओळींमध्ये ब्रिटनच्या पंतप्रधान पदाचे उमेदवार ऋषी सुनक यांनी 'केजरीवाल मॉडेल'चे अनुकरण केले आहे. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे ऋषी सुनक हे पंतप्रधान बनल्यानंतर त्यांनी वाढत्या वीज बीलांपासून मुक्ती मिळवण्यासाठी जास्तीचे पैसे देण्याचे आश्वासन दिले आहे. यामध्ये असे म्हटले आहे की, केजरीवाल मॉडेलनुसार मोफत वीज देण्याच्या घोषणेवर जोर देण्यात आला आहे. ज्याचा नुकत्याच झालेल्या पंजाब विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी फायदा झाल्याचे मत मांडले आहे.

न्यूज २४ इंडियाच्या इतर काही रिपोर्ट आणि लेखांमध्येही कोणत्याही प्रकारची बायलाईन आढळून आली नाही. यामध्ये संपादकीय मत मांडणाऱ्या लेखकाने पुराव्याशिवाय अनेक दावे केले आहेत. आज तक आणि झी न्यूजसह अनेक मीडिया चॅनलने ऋषी सुनक यांच्या या घोषणेची तुलना केजरीवाल यांच्या निवडणूक रणनितीशी केली. मात्र या रिपोर्टमध्ये दाव्यांना पुराव्याचा आधार देण्यात आला आहे न की तीन ओळीत दावे करण्यात आले आहेत. त्यामुळे न्यूज 24 इंडियाचा रिपोर्ट पत्रकारितेच्या तुलनेचा नाही. मात्र आश्चर्याची गोष्ट ही आहे की, दिल्लीचे मुख्यमंत्री अशा प्रकारे अर्धवट रिपोर्ट शेअर करत आहेत.

याबरोबरच न्यूज 24 इंडियाने लिहीलेल्या लेखात जनरल इलेक्शन आणि सार्वत्रिक निवडणूक अशा शब्दांचा वापर करण्यात आला आहे. मात्र बिझनेस स्टँडर्डमधील एका लेखात दिलेल्या माहितीनुसार ब्रिटनमध्ये होणाऱ्या निवडणूका या सार्वत्रिक निवडणूका नसून कंझर्व्हेटिव्ह निवडणूका आहेत. कारण कंझर्व्हेटिव्ह पक्षाकडे असूनही संसदेत बहुमत आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये सार्वत्रिक निवडणूकीची आवश्यकता नाही. मात्र ही निवडणूक घ्यायची किंवा नाही हे नव्या पंतप्रधानांच्या निर्णयावर अवलंबून असणार आहे.

पुढे अल्ट न्यूजने या वेबसाईटच्या प्रामाणिकतेची पडताळणी करण्यासाठी News24india.org चे विश्लेषण केले आहे.

News24India.org या वेबसाईटवर एक नजर

News24India.org या वेबसाईटला भेट दिली. त्यामध्ये या वेबसाईटच्या About या सेक्शनमध्ये अर्धवट माहिती भरण्यात आली आहे. यामध्ये संपादकाचे नाव, ई-मेल आयडी व फंडिग सोर्स दाखवण्यात आला नाही. मात्र यामध्ये असं म्हटलं आहे की, News24 एक स्वतंत्र बातम्या देणारे पोर्टल आहे. हे आपल्याला नव्या बातम्या, विश्लेषण आणि मनोरंजन, राजकारण, खेळ, स्वास्थ्य, जीवनशैली, अद्भुत तथ्य आणि काय नाही त्यावर मत व्यक्त केले जाते. हे पोर्टल तुमच्यासाठी महत्वाच्या असलेल्या प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवण्यासाठी सक्षम बनवते.




न्यूज 24 इंडिया या पोर्टलवर प्रामुख्याने उत्तराखंडमधील स्थानिक बातम्या कव्हर केल्या जातात. त्याव्यतिरिक्त काही लेख या पोर्टलवर प्रसिध्द करण्यात आले आहेत. मात्र यापैकी कोणत्याही लेखात लेखकाचे नाव दर्शवण्यात आले नाही. तर प्रत्येक लेखाच्या लेखकाविषयी by News24Desk अशी माहिती दिली आहे. तसेच News 24 india या पोर्टलवरील लेखांमध्ये एडमीनच्या ओळखीची कोणतीही माहिती देण्यात आली नाही. याबरोबरत न्यूज 24 इंडियाचा लेख अवघ्या पाच ते सहा ओळींमध्ये लिहीण्यात आला आहे.


न्यूज 24 इंडियाच्या वेबसाईटला लिंक केलेले ट्वीटर आणि फेसबुक अकाऊंट डिएक्टिवेट करण्यात आले आहेत. परंतू अल्ट न्यूजने वेबॅकवर माहिती शोधल्यानंतर ट्वीटर अकाऊंटचे अर्काइव्ह मिळाले. त्यापैकी एक अर्काइव्ह ट्वीटच्या URL ला भेट दिली. (https://twitter.com/News_24India/status/1547968410805731329) या लिंकवर गेल्यानंतर अल्ट न्यूजला @AAP_USNagar नावाच्या अकाऊंटवर रिडायरेक्ट करण्यात आले. त्यानंतर आणखी काही लिंकवर क्लिक केल्यानंतर त्या सर्व लिंक @AAP_USNagar नावाच्या अकाऊंटवर रिडायरेक्ट वर घेऊन गेले. या पेजचे नाव आम आदमी पार्टी उधमसिंह नगर असे आहे आणि पेजच्या बायोमध्ये ऑफिशियल ट्वीटर हँडल ऑफ @AAP_Uttarakhand जिल्हा उधमसिंह नगरचे अधिकृत ट्वीटर हँडल @AAP_USNagar वरील ट्वीटमध्ये न्यूज 24 इंडियाचे रिपोर्ट आणि आपशी संबंधीत ट्वीट दिसून येत आहेत.






अल्ट न्यूजने दोन्ही पेजच्या युनिक ट्वीटर आयडीमधील समान धागा शोधून पाहिला. तर या दोन्ही अकाऊंटची एकच ट्वीटर आयडी आहे. त्यामुळे यातून हे सिध्द होत आहे की, न्यूज 24 इंडियाच्या ट्वीटर पेजने आपलं ट्वीटर हँडल @News_24India चे @AAP_USNagar असं करण्यात आले आहे.




फेसबुकवर सर्च केल्यानंतर अल्ट न्यूजला News24India नाव आणि लोगो असलेलं संशयित पेज मिळाले. हे पेज 12 ऑगस्ट रोजी बनवण्यात आले आहे. तर या पेजला अवघ्या 549 लाईक्स आहेत. त्यानंतर हा लोगो गुगल रिव्हर्स इमेजमध्ये सर्च केला. त्यावेळी याच नावाचे आणखी एक पेज मिळाले. मात्र ते पेज डिएक्टिव्हेट करण्यात आले होते. परंतू त्या पेजचे cached Version मिळाले. तसेच याठिकाणी रिलेटेड पेज सेक्शनमध्ये आप आदमी पक्षाच्या उत्तराखंड प्रदेश उपाध्यक्ष डिंपल सिंह यांचे फेसबुक पेज मिळाले.




याव्यतिरीक्त अल्ट न्यूजला अशाच प्रकारे नाव आणि लोगो असलेले अजून तीन ट्वीटर हँडल मिळाले. तर यामध्ये समान धागा हा होता की, सगळ्या ट्वीटर अकाऊंटवर खूप कमी इंटरॅक्शन आणि फॉलोवर्स होते. (पहिले, दुसरे आणि तिसरे). सर्व पेज News24india.org आणि त्यांच्या संबंधित ट्वीटर पेजला लिंक आहेत. तर हे सर्व पेज सहा महिन्यांच्या काळात मनमानी पध्दतीने बनवण्यात आले आहेत.


न्यूज 24 इंडियाचे रिपोर्ट अर्धवट असतानाही आम आदमी पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी रिपोर्ट शेअर केल्याचे अल्ट न्यूजच्या निदर्शनास आले.







निष्कर्ष

वरील सर्व गोष्टींचा विचार केला तर अरविंद केजरीवाल यांनी जो रिपोर्ट शेअर केला आहे. त्यामध्ये ब्रिटनमध्ये उर्जा संकटाचा सामना करण्यासाठी ऋषी सनक यांनी केजरीवाल मॉडेल फॉलो करत असल्याचा दावा केला होता. मात्र ज्या रिपोर्टच्या आधारे केजरीवाल यांनी दावा केला होता. तो रिपोर्ट एका संशयास्पद वेबसाईटद्वारे प्रसिध्द करण्यात आला होता. तर या वेबसाईटची लिंकींग आम आदमी पक्षाच्या अनेक सदस्य आणि युनिटसोबत दिसून आली.

न्यूज 24 इंडिया या वेबसाईटच्या अबाऊट सेक्शन अपुर्ण आहे. त्यामध्ये संपादकीय टीम किंवा फंडिगचा सोर्स यासंदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आली नाही. तसेच या वेबसाईटवरील कोणत्याही लेखामध्ये लेखकाचे नाव दर्शवण्यात आले नाही. तर या फेसबुक आणि ट्वीटर पेजचे लिंक हे आपच्या विविध कार्यकर्त्यांशी जोडल्याचे दिसून आले आहे. त्यापैकी काही सध्या डिएक्टीव्हेट करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त न्यूज 24 इंडियाचे अनेक अर्धवट सोशल मीडिया पेज ऑनलाईन पाहता येतील. या पेजवर खूप कमी इंटरॅक्शन झआले आहे. त्यामुळे या न्यूज 24 इंडिया या वेबसाईटच्या सत्यतेविषयी शंका निर्माण होत आहे. त्यामुळे केजरीवाल यांनी प्रसिध्द केलेला रिपोर्टला अधिकृत पुराव्यांची स्पष्टता नाही. त्यामुळे केजरीवाल यांचा दावाही संदिग्ध असल्याचे दिसून आले आहे.

Updated : 6 Sept 2022 5:24 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top