Home > Fact Check > Fact Check : अमीर खान आणि फातिमा शेख यांच्या लग्नाच्या दाव्याचे काय आहे सत्य?

Fact Check : अमीर खान आणि फातिमा शेख यांच्या लग्नाच्या दाव्याचे काय आहे सत्य?

Fact Check : अमीर खान आणि फातिमा शेख यांच्या लग्नाच्या दाव्याचे काय आहे सत्य?
X

अमीर खानच्या तिसऱ्या पत्नीमुळे ईरा खान यांनी हे सहन करणे कठीण आहे, म्हटल्याचा रिपोर्ट झी न्यूजने लिहीले होते. तर अमीर खानची मुलगी ईरा खानने एक व्हिडीओ पोस्ट करत तिच्या वडिलांच्या तिसऱ्या लग्नामुळे ती नैराश्य आल्याचे म्हटल्याचा दावा केला होता. तर झी न्यूजने लिहीलेल्या लेखामध्ये एक फोटो जोडण्यात आला आहे. ज्यामध्ये बॉलिवूड अभिनेता अमिर खान आणि फातिमा सना शेख एका फोटोत सोबत दिसत आहेत. तर त्यांना एका नवविवाहितांसारखे दाखवले आहे. तर दुसऱ्या एका फोटोत ईरा खान रडताना दिसत आहे.






दोन दिवसानंतर फ़्यूज़ न्यूज़ नावा्च्या मीडिया आऊटलेटनी अशाच प्रकारचा रिपोर्ट प्रसिध्द केला.मात्र ही वेबसाईट मेनस्ट्रीम मीडियाचा भाग नाही. परंतू अनेक फॉलोवर्सनी आपल्या फेसबुक पेजवर फ्यूज न्यूजचा रिपोर्ट शेअऱ केला.(स्प्रेडशीट) यामध्ये आयत रहमान ( याचे 3 लाख फॉलोवर्स),सुमन (दीड लाख फॉलोवर्स ) आणि सुमैय्या खान ( १ लाख पेक्षा जास्त फॉलोवर्स) सामील आहेत.






यामध्ये विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे फातिमा सना शेखसोबत अमिर खानचा एक फोटो शेअर केला जात आहे.



जून 2021 मध्ये अमिर खान आणि किरण राव यांनी लग्नाच्या 15 वर्षानंतर घटस्फोट घेत असल्याची घोषणा केली. त्यानंतर अमिर खान याला भारतीय संस्कृतीच्या विरोधात दाखवले जाऊ लागले. त्यामुळे अमिर खानला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगला सामोरे जावे लागले.तर आमिर खानच्या खासगी आयुष्यावरून त्याला टार्गेट केले जात होते. तर आता या फोटोवरून अमिर खान याला ट्रोल केले जात आहे.पाहुयात काय आहे प्रकरण..

पहिला फोटो

अमिर खान आणि फातिमा शेख यांना एकत्रित दाखवलेला हा एक एडिटेड फोटो आहे.त्यामुळे अल्ट न्यूज ने त्याची सत्यता तपासण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अल्ट न्यूजला मिस मालिनी या वेबसाईटवर एक फोटो मिळाला. जो 2010 मधील इमरान खान आणि अवंतिका मलिक यांच्या लग्नात घेतला होता.झी न्यूजने त्या फोटोचे एडिटे़ड व्हर्जन वापरत फक्त अमिर खानसोबत फातिमा शेख उभी असल्याचाच नाही तर फातिमा शेखच्या केसात सिंदूर भरलेला फोटो दाखवला.






मिस मालिनी वेबसाईटने लग्नाचे फोटोसुध्दा शेअर केले आहेत. त्यामुळे या समारंभाचे फोटो स्टॉक वेबसाईट Alamy वर पहायला मिळतात.

दुसरा फोटो

हा फोटो मे 2021 मध्ये अपलोड करण्यात आलेल्या एका व्हिडीओमधून घेण्यात आला आहे. त्य़ामध्ये ईरा खानने तिच्या वाढदिवसाच्या निमीत्ताने एक व्हिडीओ अपलोड केला होता. तर या वीडियो ती स्वतःबद्दल बोलत होती. त्यामध्ये ईराने फिटनेसची कमी आणि सुस्तीवर चिंता व्यक्त केली. तर या व्हिडीओमध्ये इरा अमिरा खानविषयी बोलत नव्हती.







नुकताच 27 डिसेंबरला इराने इंस्टाग्राम वर अमिर खानसोबतचा एक फोटो अपलोड केला आहे.






या फोटोमध्ये छेडछाड करून फोटो सोशल मीडियावर चुकीच्या पध्दतीने पोस्ट केले आहेत. झी न्यूजने रिपोर्ट फॅक्ट चेकच्या पध्दतीने बदलला आणि लिहीले की, "आमिर और फातिमा की व्हायरल हुई फोटो की सच्चाई का खुलासा, क्या सच में तंग आई बेटी इरा खान?





तिसरा फोटो

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो एडिटेड आहे. तर खरा फोटो मानव मंगलानी याने टिपला होता. तर त्याने हा फोटो त्याच्या इंस्टाग्रामवर अपलोड केला होता. हा फोटो 2018 मध्ये आकाश अंबानी आणि श्लोका मेहताच्या लग्न समारंभातील आहे. यामध्ये आमिर खान त्याची X-wife किरण रावसोबत उभा आहे.






निष्कर्ष : अशा प्रकारे झी न्यूज सह अनेकांनी आमिर खान आणि फातिमा सना शेख यांचा एडिटेड फोटो वापरून त्यांनी लग्न केल्याचा दावा केला होता. न्यूज आऊटलेटने केलेल्या दाव्यातील फोटो आणि आमिर खानची मुलगी इरा खानने प्रसिध्द केलेला व्हिडीओ यामध्ये कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. तर इरा खानने शेअऱ केलेल्या स्क्रीनशॉटचा वापर केला आहे. तर आमिर खानने कथीत लग्न केल्याच्या दाव्यामुळे इरा खान निराश असल्याचा दावा करण्यात आला होता. तर किरण राव सोबत घटस्फोट घेतल्यानंतर आमिर खान याने अजून दुसरे लग्न केले नाही.




https://www.altnews.in/hindi/zee-news-used-doctored-image-to-claim-aamir-khan-married-fatima-sana-shaikh/

Updated : 31 Dec 2021 3:55 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top