Home > Fact Check > Fact Check: लखीमपूर घटनेत शेतकऱ्यांना चिरडणारी गाडी काँग्रेस नेत्याची?

Fact Check: लखीमपूर घटनेत शेतकऱ्यांना चिरडणारी गाडी काँग्रेस नेत्याची?

Fact Check: लखीमपूर घटनेत शेतकऱ्यांना चिरडणारी गाडी काँग्रेस नेत्याची?
X

लखीमपूर हिंसाचाराचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तीन गाड्या लखीमपूर खेरीमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडून पुढे जात असल्याचं दिसून येत आहे. महिंद्रा थार आणि टोयोटा फॉर्च्युनर या दोन गाड्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. दरम्यान, या घटनेत चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून, केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा (मोनू) या घटनेमागे सुत्रधार असल्याचा आरोप उपस्थित आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

मात्र, आरोपानंतर अजय मिश्रा यांनी त्यांचा मुलगा घटनास्थळी उपस्थितीत नव्हता. असा दावा केला आहे. दरम्यान, अनेक माध्यमांनी भाजपला पाठिंबा देत शेतकऱ्यांवर आरोप केला आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तांमध्ये आंदोलक शेतकऱ्यांनी गाडीवर दगडफेक केली होती. त्यामुळे गाडीचा तोल बिघडला. मात्र, या संदर्भात अद्यापपर्यंत कोणताही पुरावा सादर करण्यात आलेला नाही.

दरम्यान, सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ शेअर केला जात आहे. ज्यात पोलीस एका व्यक्तीची चौकशी करत आहे. व्हिडिओमध्ये बोलणारी व्यक्ती दुसऱ्या कारमध्ये (फॉर्च्यून) बसली होती. या व्यक्तीशिवाय त्या कारमध्ये इतर 5 लोक बसले होते. यासोबतच, ही गाडी अंकित दासची असल्याचं देखील त्याने म्हटलं. रिपोर्टनुसार, अंकित हा काँग्रेसचे माजी खासदार अखिलेश दास यांचा पुतण्या आहे.

दरम्यान, लखीमपूर घटनेमागे काँग्रेसचा हात असल्याचा दावा करत भाजपचे सदस्य आणि समर्थक हा व्हिडिओ शेअर करत आहेत. अमित मालवीय आणि प्रीती गांधी यांनी देखील यासंदर्भात ट्विट केलं आहे. ते म्हणतात –

"काँग्रेस नेते लखीमपूरमध्ये काय करत होते?"




याशिवाय पत्रकार अमन चोप्रा आणि हिमांशू मिश्रा यांनीही हा व्हिडिओ ट्विट केला आहे. तसेच, एबीपी न्यूज आणि दैनिक भास्करसारख्या माध्यम संस्थांनीही हा व्हिडिओ ट्विट केला आहे.

शहजाद जय हिंदनेही हा व्हिडीओ ट्विट करत, काँग्रेसचे माजी खासदार अखिलेश दास यांचे पुतणे अंकित दास गाडीच्या ताफ्यात का उपस्थित होते. असा सवाल केला आहे.

अंकित दास काँग्रेस समर्थक आहे का?

या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं आहे - नाही. अंकित दास हे भाजप समर्थक आहेत. आज तकच्या रिपोर्टनुसार, 3 ऑक्टोबर रोजी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या स्वागतासाठी लखीमपूरमध्ये पोस्टर लावण्यात आले होते. ज्यामध्ये, आशिष मिश्रा आणि अंकित दास यांचे फोटो आहेत.

दरम्यान, अंकित दास हे काँग्रेस समर्थक असल्याचं म्हटलं जात आहे. कारण ते अखिलेश दास यांचे पुतणे आहेत. अखिलेश दास हे यूपीए -1 मध्ये मंत्री होते. त्यांनी 2008 मध्ये काँग्रेस सोडली आणि बहुजन समाज पार्टीमध्ये सामील झाले. 2014 पर्यंत ते बहुजन समाज पार्टीमध्ये होते. त्यांनंतर, 2017 च्या सुरुवातीला ते पुन्हा काँग्रेसमध्ये सामील झाले आणि एप्रिल 2017 मध्ये त्यांचं निधन झालं.

मात्र, अंकित दास हे भाजप नेते आणि राज्यमंत्री अजय मिश्रा आणि त्यांचा मुलगा आशिष मिश्रा यांचे जवळचे असल्याचं दिसून येतं. अंकित आणि अजय मिश्रा यांच्या फोटोच एक पोस्टर आपण पाहू शकतो. अंकितने केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या वाढदिवसानिमित्त हा फोटो शेअर करत अजय मिश्रा यांना त्याचे मार्गदर्शक म्ह्णून संबोधलं होतं.



अंकितने अजय मिश्रासोबतचे काही फोटो फेसबुकवर देखील पोस्ट केले आहेत. यातील काही फोटोंमध्ये ते भाजप नेत्यांसोबत अजयच्या घरी दिसत आहे. खाली दिलेल्या एका पोस्टमध्ये अंकितने अजयचे वर्णन 'प्रिय मित्र' असे केले आहे.






दरम्यान, काँग्रेस नेत्यांना पाठिंबा देणारी किंवा काँग्रेसचं समर्थन करणारी कोणतीही पोस्ट अंकितने फेसबुकवर शेअर केलेली पाहायला मिळत नाही.

मात्र, आशिष मिश्रा आणि भाजप लखीमपूर नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून भाजपच्या कार्यक्रमांमधील अंकितचे फोटो अनेकदा शेअर करण्यात आले आहेत.

अंकित हे अखिल भारतीय वैश एकता परिषदेचे उपाध्यक्ष असल्याचं सांगतात. ही संघटना भाजपला उघडपणे पाठिंबा देते. या पक्षाच्या कार्यक्रमात भाजप पक्षाचे नेतेही भाषणं करत असतात.

'ऑप इंडियाने' दिलेल्या रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, काँग्रेस नेत्यांनी पोलिसांच्या चौकशीचा एक अपूर्ण व्हिडिओ शेअर केला आहे. रिपोर्टमध्ये, अंकित दासचा भाजपसोबत असलेल्या जवळकीबद्दल कोणताही उल्लेख केलेला नाही. मात्र, ही गोष्ट त्याच्या राजकीय कार्यातून स्पष्टपणे दिसून येते.

दरम्यान, भाजपचे सदस्य आणि समर्थक हे सिद्ध करण्यात व्यस्त आहेत की, अंकित हा काँग्रेसचे माजी नेते अखिलेश दास यांचा भाचा आहे. मात्र, अंकित दास आणि आशीष मिश्रा हे मित्र आहेत.

'द टाइम्स ऑफ़ इंडिया' च्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ती फॉर्च्युनर गाडी अंकित दासच्या नावावरचं रजिस्टर आहे.

निष्कर्ष:

एकंदरितच ही अंकित दास नावाच्या व्यक्तीची आहे. मात्र, सदर व्यक्ती भाजप समर्थक असल्याचं त्यांच्या आत्तापर्यंतची भाषण आणि सोशल मीडियावरील पोस्टवरून दिसून येते. त्यामुळं ही गाडी भाजप समर्थकांची असल्याची स्पष्ट होते.

या संदर्भात Alt news ने Fact check केलं आहे.


Updated : 23 Nov 2021 4:39 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top