Home > Fact Check > Fact Check: आदित्य ठाकरे यांचं उर्दू भाषेतील पोस्टर व्हायरल, काय आहे सत्य?

Fact Check: आदित्य ठाकरे यांचं उर्दू भाषेतील पोस्टर व्हायरल, काय आहे सत्य?

Fact Check: आदित्य ठाकरे यांचं उर्दू भाषेतील पोस्टर व्हायरल, काय आहे सत्य?

Fact Check: आदित्य ठाकरे यांचं उर्दू भाषेतील पोस्टर व्हायरल, काय आहे सत्य?
X

महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे बॅनरवरील फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. भाजप समर्थक हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल करत आहेत. त्यावर उर्दू भाषेत 'سلام ورلی' 'नमस्ते वरळी' असं लिहिलं आहे.

भाजपच्या नॅशनल मीडिया पॅनलिस्ट चारु प्रज्ञा यांनी हे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना

भगव्या पासून हिरव्या रंगापर्यंत.

मराठी ते उर्दू.

शिवसेनेकडून …………… ..?

असं कॅप्शन दिलं आहे.


शेफ़ाली वैद्य यांनी देखील हे ट्वीट केलं आहे. त्याचं कॅप्शन त्यांनी "हिंदूहृदय सम्राटांचे नातू!" असं दिलं आहे.


आणखी एका ट्विटर युजर ने हा फोटो ट्वीट केला आहे. त्याचं कॅप्शन आदित्य यांनी मराठी अस्मितेला श्रद्धांजली दिली असल्याचं म्हटलं आहे.


फेसबूक वर देखील मोठ्या प्रमाणात हे फोटो व्हायरल झाले आहेत.

काय आहे सत्य? Fact Check

गुगल वर रिव्हर्स इमेज सर्च केलं असता ऑल्ट न्यूज़ ला न्यूज 18 ची एक 2019 ची बातमी सापडली. 2019 ला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान वरळी येथून आदित्य ठाकरे यांनी उमेदवारी दाखल केल्यानंतर वेगवेगळ्या भाषेमध्ये पोस्टर लावण्यात आले होते. या फलकांवर गुजराती, हिंदी, मराठी आणि अरबी लिपीमध्ये 'नमस्ते वरळी' असं लिहिण्यात आले होते.










निष्कर्श काय?

एकंदरित वरील सर्व पोस्टर पाहिल्यानंतर एक बाब स्पष्ट होते. आदित्य ठाकरे यांच्या एकूण पोस्टर पैकी फक्त धार्मिकता दाखवणाऱ्या एका होर्डिंगचे चित्र सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आणि ते मुस्लिम समुदायाला प्रोत्साहन देत असल्याचा दावा या पोस्ट मधून करण्यात येत आहे. मात्र, वास्तविक पणे 2019 च्या निवडणूका दरम्यानचं विविध भाषांपैकी एकच पोस्ट धार्मिक Angel दाखवण्यासाठी व्हायरल करण्यात आली आहे.

या संदर्भात Alt News ने फॅक्ट चेक केलं आहे. https://www.altnews.in/aaditya-thackerays-2019-photo-cherry-picked-to-falsely-portray-muslim-appeasement/


Updated : 9 Sept 2021 5:25 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top