Fact Check : बांग्लादेशात हिंदूंची दुकानं आगीच्या हवाली?
बांग्लादेशातील चटगाव भागातील बोलखली तालुक्यातील कधुरखली या गावात हिंदूं समाजाच्या सहा किराणा दुकानांना आग लावल्याच्या दाव्यासह एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. पण हा दावा खरा आहे का? जाणून घेण्यासाठी वाचा...
X
टर अकाऊंट व्हाईस ऑफ बांग्लादेशने हा व्हिडीओ याच दाव्यासह शेअर केला आहे. मात्र त्यानंतर या अकाऊंटवरून हा व्हिडीओ डिलीट करण्यात आला. (अर्काइव्ह लिंक)
ई पेपर सनातन प्रभातने यासंदर्भात रिपोर्ट प्रसिध्द केला होता. तर या आर्टिकलसाठी सोर्स म्हणून व्हाईस ऑफ बांग्लादेशच्या ट्वीटचा हवाला देण्यात आला होता.
फेसबुक पेज সনাতন একতা মঞ্চ (सनातन एकता मंच) ने या फोटोंसह #SaveBangladeshiHindu आणि #savebangladeshihindustemple या हॅशटॅगसह पोस्ट केला होता. या पोस्टमध्ये संबंधीत दाव्यासह पोस्टमध्ये दुकानांच्या हिंदू मालकांची नावं देण्यात आले आहेत. तर दुकानदारांची नावं रोनी डे, डोलन आणि परिमल देबनाथ असल्याचा दावा करण्यात आला आहे.
पडताळणी :
व्हायरल होत असलेल्या दाव्यात सांगितलेली जागा अल्ट न्यूजने गुगल सर्च केली असता बांग्लादेशी माध्यमांनी या घटनेवर रिपोर्ट केल्याचे दिसून आले.
जागो न्यूज रिपोर्टच्या माहितीनुसार २ ऑगस्टच्या सकाळी 4 वाजेच्या आसपास कधुरखली सरकारी हायस्कुलच्या जवळ भीषण आग लागली. त्यामध्ये तीन शेळ्या आणि पाच दुकाने जळून खाक झाले. त्यापैकी एक किराणा दुकान, एक सलून, दोन भाज्यांची दुकाने आणि एक कुलींग कॉर्नर जळून खाक झाला. याव्यतिरीक्त दैनिक आझादी, चट्टोग्राम न्यूज, चट्टोग्राम खोबोर आणि जागो न्यूजसहीत अनेक माध्यमांनी दोन दुकानांच्या मालकांची नावं ही मुहम्मद मोहर्रम आणि मोहम्मद करीम असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे अशा प्रकारची नावं ही मुस्लिमांची असतात, हे स्पष्ट होते.
अल्ट न्यूजला या घटनेचा फेसबुकवर व्हिडीओ मिळाला. जो व्हिडीओ बोलखली येथील एस एम अरिफ यांनी अपलोड केला होता. हा व्हिडीओ सकाळी 8 वाजून 49 मिनिटांनी म्हणजेच घटनेच्या चार तासानंतर अपलोड करण्यात आला होता. कॅप्शनमध्ये लिहीले होते की, "আজ ভোরের দিকে কধুরখীল স্কুলের পশ্চিম দিকে থাকা সব দোকান আগুনে পুড়ে গেছে।" (याचा मराठी अनुवाद – आज सकाळी तडके कधुरखिल पश्चिमेकडील सर्व दुकाने जळून गेली. मात्र यानंतर अनेकांनी व्हिडीओखाली कमेंट करत आग कशाने लागली असा प्रश्न विचारला. त्यावर एस एम अरिफ यांनी कदाचित शॉर्च सर्किटने लागली असण्याची शक्यता वर्तवली आहे.
बोलखली फायर सर्विस प्रमुख हैदर हुसेनने जागो न्यूजला दिलेल्या प्रतिक्रीयेमध्ये म्हटले आहे की, आग लगण्याचे कारण वीजेच्या शॉर्ट सर्किट असू शकते. तसेच स्थानिक लोकांनी बोलखली फायर सर्विसला माहिती दिल्यानंतर बोलखली सर्विसच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. रोनी रॉयने जागो न्यूजसोबत संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, यांचे किराण्याचे दुकान आगीत जळून गेले. त्यांनी पुढे सांगितलं की, माझी एक शेळी, एक मोटारसायकल आणि दुकानातील संपुर्ण सामान जळून खाक झाले. मी हे खरेदी करण्यासाठी कर्ज घेतले होते. पण या आगीने मला रस्त्यावर भीक मागायला भाग पाडल्याची प्रतिक्रीया दिली.
अल्ट न्यूजने बोलखली फायर सर्विस स्टेशनशी संपर्क साधला. यावेळी अग्निशमन अधिकाऱ्याने या आगीत हिंदू आणि मुसलमान दोन्हीही धर्माच्या लोकांची घरं आणि दुकानं जळल्याचे सांगितले. तर या आगीचे कारण काय असू शकते? असा सवाल केला असता त्यांनी म्हटले की, अजून चौकशी सुरू आहे. मात्र वीजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असण्याचा प्राथमिक अंदाज आहे, असंही अग्निशमन अधिकाऱ्याने सांगितले.
निष्कर्ष :
यावरून बांग्लादेशातील चटगांव जिल्ह्यातील बोलखली भागात घडलेल्या आगीच्या दुर्घटनेचा व्हिडीओ आणि फोटो शेअर करत हिंदूंची 6 घरं आणि दुकानं दुसऱ्या धर्मीयांनी जाळल्याच्या दाव्यासह शेअर केला जात आहे. मात्र आगीत हिंदू आणि मुस्लिमांची दुकानं जळाल्याचे दिसून आले. तर ही आग वीजेच्या शॉर्ट सर्किटमुळे घडल्याचे सांगितले.