Nanded | नांदेड जिल्ह्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत
X
मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला आहे . किनवट तालुक्यातील किनवट ,बोधडी,इस्लापुर, जलधारा,शिवणी या भागात गेल्या २४ तासात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. या मंडळात एकूण १३५ मिमी पावसाची नोंद झाली आहे . तर भोकरच्या मोघडी परिसरात ६५.५० मिमी तर बिलोली तालुक्यातील सगरोळी परिसरात ८५.५० मिमी पाऊस झालाय.
गेल्या शुक्रवारी, शनिवारी जिल्ह्यातील बिलोली, देगलूर भागात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे या भागात निर्माण झालेली पूरस्थिती सावरलेली नसताना रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे पुन्हा पूरस्थिती निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात ७ लाख ६६ हजार ८०९ हेक्टरक्षेत्र पेरणीसाठी प्रस्तावित असताना बहुतांश भागातली पिके अक्षरशः खरडून गेली आहेत. नांदेड जिल्ह्यात आणखी दोन दिवस पाऊस असल्याने अलर्ट जारी करण्यात आले आहे.