Home > Environment > पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली; प्रशासनाने घेतला निर्णय

पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली; प्रशासनाने घेतला निर्णय

पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली; प्रशासनाने घेतला निर्णय
X

कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे धरण क्षेत्रातील पाण्यासाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. राधानगर धरण ओसांडून वाहत आहे. तसंच जिल्ह्यातील ८३ बंधारे पाण्‍याखाली गेले आहेत, यामुळे वाहतूक कोंडी ही वाढलेली आहे. प्रशासन देखील सतर्क झाले असून जिल्ह्यातील पूर प्रवर्तन क्षेत्रातील २८ गावांमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीनं इशारा पातळी पार करून धोका पातळीकडे वाटचाल केली असुन पुरपरिस्थितीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सुरक्षितात म्हणून जिल्हा प्रशासनाने नदी कटाच्या गावकऱ्यांच्या स्थलांतर सुरु केलं आहे, पुढील ४ दिवस राज्यता 'ऑरंगे अलर्ट' दिला आहे.





Updated : 26 July 2023 1:00 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top