Home > Environment > The kerala stories चित्रपटावर आक्षेप...

The kerala stories चित्रपटावर आक्षेप...

The Kerala stories या चित्रपटाचा trailor नुकताच लाँच झाला आणि येताच क्षणी त्यावर आक्षेप घेण्यास म्हणजेच चित्रपटाला बॉयकॉट करण्यास सुरुवात झाली.

The kerala stories चित्रपटावर आक्षेप...
X

The Kerala stories या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे. आणि ट्रेलर येताच क्षणी त्यावर आक्षेप घेण्यास म्हणजेच चित्रपटाला बॉयकॉट करण्यास सुरुवात झाली. जणू काही चित्रपटाला बॉयकॉट करणं हा नवीन ट्रेंडच सुरु झाला आहे. न्यायालयत याचिका दाखल करून एखाद्या चित्रपटावर बंदी घालण्याचा हेतू अजूनपर्यंत तरी सफल झाला नाही.

याउलट त्या चित्रपटालाच पब्लिसिटी मिळते; असा बोलायला हरकत नाही, हे असेच चालत आलेले वारंवार दिसत आले आहे. फार फार तर चित्रपटाच्या प्रदर्शनास स्थागितीचा निर्णय न्यायालय देऊ शकते आणि चित्रपटावर बंदी आणायला टपलेल्या लोकांना त्यावरच समाधान मानावे लागते. मात्र सत्ताधारी बंदी घालण्याचा निर्णय घेऊ शकतात आणि प्रशासकीय आणि पोलीस बळ वापरून ते आमलात देखील आणू शकतात. आणि हेचं BBC वरील The modi question या विवेचनपटावर केंद्र सरकारने लादलेल्या बंदी वरून दिसून येते. मात्र आज कालच्या काळातील इंटरनेट प्रसारामुळे या बंदीचा पुरता फज्जा कसा उडाला हेही दिसले होते.

The keral story या चित्रपटावर बंदी घालण्यास आपण अजिबात इच्चीत नसल्याचे संकेत केरळचे उच्च न्यायालय देत आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने आमच्यापुढे हि याचिको नकोच ती उच्च न्यायलायतच आधी चालवा असे म्हटले असताना केरळ सरकार तरी बंदीचा उपाय योजणार काय हे पाहणे महत्वाचे ठरेल.

केरळ राज्याचे विपरीत पणे चित्रण या चित्रपटात झाले आहे असा आक्षेप स्वतः राज्याचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी घेतलेला आहे. चित्रपटाच्या प्रसिद्धी तंत्राचा भाग म्हणून ३२ हजार केरळी मुलींची धर्मांतरे झाली, अशा जाहिराती केल्या जात असताना या राज्याचे मुख्यमंत्री सावध झाले आहेत. मात्र केरळच्या 'जमियत उलेमा-इ-हिंद' या संघटनेने कोणताही अवैध मार्ग वापरलेला नाही. किंवा छापाच्या धमक्या दिलेल्या नाहीत. पण न्यायालयांचे काम बंदी घालण्याचे नाही, हे न ओळखण्याचा बिनडोकपणा आजवर इतरांनी जसा दाखवला तसाच आणि तितक्याच प्रमाणात मुस्लिम उलेमांच्या संघटनेने हि दाखवला.

या आधी सुद्धा पद्मावत, आर्टिकल १५ तसेच द काश्मीर फाइल्स सारख्या अनेक चित्रपटांवर समाजकंटकांकडून आक्षेप घेण्यात आला होता. पण तो काही सफल झाला नाही शेवटी चित्रपट OTT Platform वर का होईना चित्रपट प्रदर्शित करण्यात आले. बंदी नसणे, हा कोणत्याही प्रकारे कुणाचाहि विजय ठरत नाही. त्यामुळे द केरळ स्टोरीस वर बंदी तर नकोच, पण ती नाही हाच आमच्यावर अन्याय असणार असे रडगाणे मुस्लिमांनी गाऊ नये आणि हिंदूंनी ही आम्हीचं खरे असल्याचे भाष्य करू नये...

Updated : 4 May 2023 1:23 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top