Maharashtra Rain update : कोणत्या विभागात किती पाऊस ; एकीकडे मुसळधार तर दुसरीकडे हलक्या सरी
X
महाराष्ट्रात जुलै महिन्यात सरासरीच्या १७ टक्के अतिरिक्त पाऊस ठरला आहे. मात्र, राज्यभरात पावसाचे प्रमाण काहीस वेगळ होतं. काही जिल्ह्यात अतिमुसळधार तर पावसाचा तुटवडा कायम राहीला राहीला आहे . सर्वाधिक कोकणात पावसाची नोंद झाली असली तरी उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात अजूनही पुरेसा पाऊस पडलेला नाही. ऑगस्टमध्ये राज्यात फारसा पाऊस पडणार नसल्याचे अनुमान वर्तवण्यात येत आहे. आधीच कमी पाऊस पडलेल्या विभागात पुढील दोन महिन्यांबद्दलही प्रश्न निर्माण झाला आहे.
कोकण आणि गोवा विभागांमध्ये अतिरिक्त पाऊस पडला आहे. मध्य महाराष्ट्र विभागात सरासरीइतकाच, तर मराठवाडा विभागामध्ये सरासरी पाऊस १३ टक्के अतिरिक्त नोंदला गेला आहे. विदर्भ विभागातही १४ टक्के पाऊस अतिरिक्त नोंद करण्यात आली आहे.
कोकण विभागामध्ये रत्नागिरी जिल्हा वगळता इतरत्र अतिरिक्त किंवा तीव्र अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे. मुंबई उपनगर, ठाणे जिल्हा तसेच पालघर जिल्हा येथे अतिरिक्त पाऊस नोंदला गेला आहे. मात्र, कोकण विभागात अलिबाग आणि रत्नागिरीमध्ये पावसाची अजूनही आहे. २९ जुलैच्या नोंदीनुसार अलिबाग केंद्रावर सरासरीपेक्षा ७५७.८ मिमी पाऊस कमी नोंदला गेला आहे. तर रत्नागिरी केंद्रावर ९५.८ मिलीमीटर पाऊस सरासरीपेक्षा कमी आहे.
मध्य महाराष्ट्रामध्ये सांगली आणि सातारा जिल्ह्यामध्ये अनुक्रमे ३१ टक्के आणि २४ टक्के पावसाची तूट आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पाऊस सरासरीच्या श्रेणीत असला, तरी या जिल्ह्यात सरासरीपेक्षा पावसाची १२ टक्के तूट आहे. धुळे जिल्ह्यातही ६ टक्के तूट नोंदली गेली आहे. अहमदनगर केंद्रावर सरासरीहून १३९.१ मिमी पाऊस कमी आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ५ टक्के पाऊस अधिक असला, तरी कोल्हापूर केंद्रावर मात्र १७४ मिमी पावसाची तूट आहे.
नाशिक जिल्ह्यातही तेच चित्र आहे. जिल्ह्यात सरासरीहून १२ टक्के पाऊस जास्त आहे. मात्र, नाशिक केंद्रावर १३३.६ मिमी पावसाची तूट आहे. यावरून जिल्ह्यातील सरासरी गाठली असली, तरी शहरांमध्ये किंवा संबंधित केंद्रांवर पुरेसा पाऊस पडलेला नाही, हे चित्र समोर येत आहे. अकोला जिल्ह्यात ५ टक्के तूट, अमरावतीत ९ टक्के तूट आणि बुलढाणा जिल्ह्यात २ टक्के तूट नोंदली गेली आहे. इतर जिल्ह्यांमध्ये पाऊस सरासरीहून अधिक आहे. भंडारा आणि चंद्रपूर या दोन्ही जिल्ह्यांमधील पाऊस सरासरीहून २४ टक्के अधिक आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये २९ जुलैला ११ टक्के पाऊस आहे. मात्र, नागपूर केंद्रावर सरासरीपेक्षा ४०८.३ मिमी पाऊस कमी आहे.
मराठवाडा विभागामध्ये जालना जिल्ह्यात पावसाची सर्वाधिक म्हणजे ३८ टक्के तूट आहे. संभाजीनगर जिल्ह्यात १४ टक्के, बीडमध्ये सात टक्के, हिंगोलीत १५ टक्के पावसाची तूट आहे. दुसरीकडे नांदेड जिल्ह्यात तीव्र अतिरिक्त म्हणजे ८१ टक्के पाऊस पडला आहे. तर लातूरमध्ये ३५ टक्के पाऊस अतिरिक्त आहे. विभागातील या असमतोलामुळे सरासरी आकडेवारीचे चित्र बदलले आहे. विदर्भ विभागातही हा असमतोल दिसून येतो. मात्र, मराठवाड्याच्या तुलनेत गेल्या दोन आठवड्यांमध्ये दिलासा मिळाला आहे.