Home > Environment > शंतनू मोघे दिसणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत

शंतनू मोघे दिसणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत

सध्या इतिहासावर आधारीत वेगवेगळे चित्रपट प्रदर्शित होत आहेत. त्यातच आणखी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासावर आधारीत रावरंभ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे

शंतनू मोघे दिसणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत
X

गेल्या वर्षी अनेक ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. त्यातील अनेक चित्रपटांना प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे यंदाही काही ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. सर्वच चित्रपटांची प्रेक्षक वेगवेगळ्या कारणांसाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. यापैकी एक चित्रपट म्हणजे 'रावरंभ' (RAVRAMBHA) आहे. या चित्रपटाची घोषणा काही महिन्यांपूर्वी झाली होती. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) भूमिका कोण साकारणार? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. या चित्रपटात अभिनेता 'शंतनू मोघे' (Shantanu Moghe) छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी त्यांनी 'स्वराज रक्षक संभाजी' या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्याचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. हा चित्रपट 7 एप्रिल 2023 रोजी रिलीज होणार आहे.


शिवजयंतीनिमित्त (Shiv Jayanti) ‘रावरंभ’ चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. याविषयी बोलताना तो म्हणाला, "छोट्या पडद्यावर साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची 'स्वराज्य रक्षक संभाजी' (Swaraj Rakshak Sambhaji) या मालिकेतील भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. मोठ्या पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणे ही आनंदाची गोष्ट आहे. या भूमिकेचे गारुड आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. 'रावरंभ' हा अतिशय भव्य आणि चकीत करणारा चित्रपट आहे. एक अभिनेता म्हणून मी खूप भाग्यवान समजतो की, मला 'रावरंभ' चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका करायला मिळाली. एक महान व्यक्तिमत्व ज्याने आपला प्रेरणादायी इतिहास घडवला, समाजाला नवा विचार दिला, त्यामुळे अशी भूमिका निभावणे हे निश्चितच मोठी सामाजिक जबाबदारी घेऊन येते. 'शशिकांत पवार' (Shashikant Pawar) प्रॉडक्शन अंतर्गत 'रावरंभ' चित्रपटाचे दिग्दर्शन 'अनुप जगदाळे' (Anup Jagdale) यांनी केले आहे. 'रावरंभ' चित्रपटाची पटकथा आणि संवाद 'प्रताप गंगावणे' (Pratap Gangavane) यांचे आहेत.

Updated : 19 Feb 2023 12:43 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top