Oh, to be 21 again
A young woman spoke out against the politics of hate, on friendship with Pakistan, on seeking peace not war. Within minutes she was attacked by the soldiers of nationalism. How dare she challenge the dominant narrative of nationalism? Why should she shoot of the shoulders of a martyred father? Hey, why should a young woman be speaking at all on political issues: students, especially women, are supposed to study, stay silent and not have an opinion. Isn't that what our patriarchal culture is all about ? So what if she wanted to express herself against the campus violence? She, like many others, is expected to simply hold her peace. And if she does choose to speak, then she must be lampooned, threatened, bullied into submission. I don't know Gurmehar Kaur. Maybe she is just a teenager who has a romanticised view of Indo PAK relations; maybe she has mixed the issue of campus violence with her own political choices. Maybe she should have expected a hostile reaction for her controversial remarks.
Hell, enough of the maybes: whoever she is, she can't be branded anti national simply because her views don't match ours. Who are these thekedars of patriotism who will continue to hand over certificates of nationalism even while threatening a young girl with rape? Truth is: this isn't about a shrill and polarised 'nationalism' debate: it's about a young woman having the right to speak up without fearing retribution in any form. It's about the core issue of who was responsible for the violence on the Ramjas college campus in the first place. The goons, whichever political outfit they belong to, must be caught and punished. As for Gurmehar, she will slip out of prime time headlines soon. But atleast for a few hours, she has reminded us of what we all ought to be: brave citizens of this great country who dare to dream differently, who challenge the powerful, who aren't cowed down by twitter bullies. Oh, to be 21 all over again!
एक तरुण स्त्री द्वेषाच्या राजकारणाविरोधात, पाकिस्तानशी मैत्री करण्याबाबत आणि युद्ध नव्हे, तर शांततेचा शोध घेण्याबाबत आपले मत व्यक्त करते आणि काही मिनिटांतच राष्ट्रवादाचे सैनिक तिच्यावर हल्लाच चढवितात. राष्ट्रवादासारख्या प्रबळ गोष्टीला आव्हान देण्याची तिची हिंमतच कशी झाली? तिने तिच्या शहीद वडीलांच्या खांद्यावरुन गोळी का चालवावी? आणि हो, एका तरुण स्त्रिला राजकीय समस्येवर बोलण्याची मुळात गरजच कायः विद्यार्थी आणि खास करुन महिलांकडून अपेक्षा आहे ती केवळ अभ्यास करण्याची, गप्प रहाण्याची आणि कोणतेही मत नसण्याची. हिच तर आपली पितृसत्ताक संस्कृती नाही का? मग काय झाले, जर तिला महाविद्यालयाच्या परिसरात सुरु असलेल्या हिंसाचाराविरोधात व्यक्त व्हावेसे वाटले? तिने, इतर अनेकांप्रमाणेच, शांत बसणेच अपेक्षित आहे. आणि तरीही तिने व्यक्त होण्याचा मार्ग निवडलाच, तर मग तिची टर उडवली गेलीच पाहिजे, तिला धमाकावलेच पाहिजे आणि तिने शरणागती पत्करावी म्हणून तिचा छळवादही मांडला पाहिजे. मी गुरमेहर कौरला ओळखत नाही. कदाचित ती भारत-पाक संबंधाबाबत खूपच स्वप्नाळू मतं असलेली किशोरवयीन मुलगी आहे, कदाचित महाविद्यालयीन परिसरातील हिंसाचाराची समस्या आणि तिची स्वतःची राजकीय पसंती यांची सरमिसळही तिने केलेली असेल. कदाचित आपल्या वादग्रस्त वक्तव्यावर विरोधी प्रतिक्रीयांची तिने अपेक्षा ठेवायला हवी होती.
बापरे, पुरे झाले हे कदाचित. ती जी कोणी आहे, केवळ तिची मते आपल्याशी जुळत नाहीत म्हणून आपण तिच्यावर राष्ट्रविरोधी होण्याचा शिक्का मारु शकत नाही. देशभक्तीचे हे कोण ठेकेदार आहेत, जे राष्ट्रवादाची प्रशस्तीपत्रकं देत रहाणार आहेत आणि तेदेखील दुसरीकडे एका तरुण मुलीला बलात्काराची धमकी देत असताना? सत्य हे आहे, की हे केवळ कर्कश आणि ध्रुवीकरण झालेल्या ‘राष्ट्रवादाच्या’ वादविवादाबाबत नसून, एका तरुण स्त्रिला कोणत्याही भितीशिवाय बोलण्याचा हक्क मिळण्याबाबत आहे. मुख्य म्हणजे रामजस महाविद्यालय परिसरातील हिंसाचारासाठी कोण जबाबदार आहे, हा कळीचा प्रश्न आहे. गुंड, मग ते कोणत्याही राजकीय गटाचे असोत, पकडले गेलेच पाहिजेत आणि त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे. गुरमेहरबाबत बोलायचे झाले, तर ती लवकरच ठळक बातम्यांमधून गायब होईल. पण काही तासांसाठी का होईना, तिने आपल्याला, आपण सगळ्यांनी कसे असायला हवे, याची जाणीव करुन दिली आहेः या महान देशाचे शूर नागरिक, जे वेगळ्या प्रकारे स्वप्न बघण्याची हिंमत करतात, जे शक्तीशालींनाही आव्हान देतात, जे ट्विटरवरील गुंडांमुळे भयभीत होत नाहीत. ओह, पुन्हा एकदा २१ वर्षांचे झाल्यासारखेच!
राजदीप सरदेसाई