Home > Election 2020 > 52 मुलांना जन्म देणाऱ्या महिलांसंदर्भातल्या राहुल गांधींच्या व्हिडीओ मागचं सत्य
52 मुलांना जन्म देणाऱ्या महिलांसंदर्भातल्या राहुल गांधींच्या व्हिडीओ मागचं सत्य
Max Maharashtra | 25 April 2019 6:16 PM IST
X
X
राहुल गांधी यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यामध्ये राहुल गांधी म्हणतात की,
युपी मे ऐसी महिलायें है, वो हर सप्ताह एक बच्चा पैदा कर सकती है, ऐसी महिलायें है जो साल में 52 बच्चे दे रही है’’.
भाजपच्या बहुतांश नेत्यांनी आपापल्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केलाय. मात्र, या व्हिडीओचं Fact Check केलंय मॅक्स महाराष्ट्रनं.
भाजपचे बिहारमधून राज्यसभेवर खासदार असलेले आर. के. सिन्हा यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर राहुल गांधींचा व्हिडीओ टाकलेला आहे. यात ‘’राहुल ने ढूँढ़ लिया साल में ५२ बच्चे देने वाली महिलाओं को! अब चुनाव हारकर ऐसी ही महिला से शादी कर हर साल ५२ बच्चे पैदा करेंगे श्रीमान जी!’’ अशी पोस्टही व्हिडीओसोबत खासदार सिन्हा यांनी जोडलेली आहे. खासदार सिन्हा यांच्या ट्विटरवरील व्हिडीओमध्ये राहुल गांधी हे भाषणात
‘’युपी मे ऐसी महिलायें है, वो हर सप्ताह एक बच्चा पैदा कर सकती है, ऐसी महिलायें है जो साल में 52 बच्चे दे रही है’’, असं वक्तव्यं करत आहेत.
[video width="320" height="240" mp4="http://maxmaharashtra.com/wp-content/uploads/2019/04/WhatsApp-Video-2019-04-25-at-4.03.20-PM.mp4"][/video]
Fact Check
मात्र, या व्हिडीओचं Fact check केल्यानंतर वस्तुस्थिती वेगळीच असल्याचं समोर आलंय. 14 नोव्हेंबर 2011 मध्ये उत्तरप्रदेशातील फुलपूर इथं एका सभेदरम्यान राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील भ्रष्टाचारावर वक्तव्यं केलं होतं. त्यात राहुल गांधींच्या भाषणातील महिलांसंदर्भात सोयीचा भाग तेवढा वापरण्यात आला आहे. मात्र त्यामागचा संदर्भ वापरण्यात आलेला नाही.
राहुल गांधी यांचा मूळ व्हिडीओ
राहुल गांधींच्या मुळ व्हिडीओमध्ये राहुल यांनी उत्तरप्रदेश मधील राज्य सरकारच्या भ्रष्टाचारावर गंभीर टीका केली होती. त्यावेळी केंद्रात काँग्रेसचं सरकार होतं तर उत्तरप्रदेशमध्ये समाजवादी पक्षाचं सरकार होतं. फुलपूरच्या सभेतील या व्हिडीओमध्ये राहुल गांधी म्हणाले होते, केंद्र सरकारकडून उत्तरप्रदेश सरकारला हजारो कोटी रूपयांचा निधी दिला. त्याचा उ.प्र. सरकारनं गैरवापर केला. माहिती अधिकाराचा वापर करून आम्ही माहिती काढली तेव्हा ती धक्कादायक होती. माहिती अधिकाराच्या अर्जात मिळालेल्या माहितीनुसार उ.प्रदेशमध्ये अशा महिला आहेत ज्या दर आठवड्याला एक मुल जन्माला घालू शकतात म्हणजेच वर्षाला 52 मुलं जन्माला घालू शकतात. कारण जननी सुरक्षा योजनेअंतर्गत मुलं जन्माला आल्यानंतर केंद्र सरकारकडून त्या मातांना 1400 रूपयांची मदत दिली जाते, असं वक्तव्यं राहुल यांनी केलं होतं तेच मुळात माहिती अधिकाराचा संदर्भ देत. हा संपूर्ण व्हिडीओ 8 मिनिटं 10 सेकंदांचा असून त्यातील फक्त 10 सेकंदांचा व्हिडीओ वापरून तो व्हायरल करण्यात आला आहे. त्यामुळं या 10 सेकंदाच्या व्हिडीओ हा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. त्यामुळं वरील वाक्य जरी राहुल गांधी यांचंच असलं तरी संपूर्ण संदर्भासहित तो व्हिडीओ न वापरल्यामुळं तो व्हायरल करण्यामागचा उद्देश स्पष्ट होतोय.
Updated : 25 April 2019 6:16 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire