Home > Election 2020 > मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघात जितेंद्र आव्हाड बाजी मारणार का?

मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघात जितेंद्र आव्हाड बाजी मारणार का?

मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघात जितेंद्र आव्हाड बाजी मारणार का?
X

राज्यात झालेल्या मागील विधानसभा निवडणुकीत मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस च्या जितेंद्र आव्हाड यांनी 86 हजार 533 एवढी मते घेत विजय मिळवला. मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना चे दशरथ पाटील होते. आव्हाडांचे नाव कोणत्याही घोटाळ्यात न आल्याने त्यांच्या विरोधात प्रचार करायला देखील खूप कमी वाव आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा

वंचित आघाडीकडून जर मोठ्या प्रमाणात मते विभागली गेली तर आव्हाडांची सीट धोक्यात येऊ शकते कारणं या मतदारसंघात बरीच विकासाची कामे अजुन करायची बाकी आहेत. याचा फटका आव्हाडांना नक्की बसेल त्याचप्रमाणं युतीच्या जागा वाटपात कळवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्र हे शिवसेनेकडे असले तरी या मतदारसंघात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने जोरदार मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. या मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जीतेंद्र आव्हाड यांचा पराभव करण्याच्या हालचाली संघाकडून सुरू झाल्या असून त्यासाठी जवळपास एक हजार स्वयंसेवक या भागात सक्रीय झाल्याचे वृत्त आहे. कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने अभिनेत्री दीपाली सय्यदला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड विरुद्ध दीपाली सय्यद अशी लढत होणार आहे.

Updated : 20 Oct 2019 7:11 PM IST
Next Story
Share it
Top