Home > Election 2020 > लोकसभा निवडणूक 2019 : लोकसभेच्या निकालात आकड्यांचा घोळ; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

लोकसभा निवडणूक 2019 : लोकसभेच्या निकालात आकड्यांचा घोळ; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

लोकसभा निवडणूक 2019 : लोकसभेच्या निकालात आकड्यांचा घोळ; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल
X

लोकसभेच्या निवडणुकीत (Lok Sabha Elections 2019) इलेक्ट्रानिक वोटिंग मशीन (EVM) चा वापर करण्यात आला होता. मात्र, निकाल लागल्यानंतर मतदानाची आकडेवारी आणि निकालानंतरची आकडेवारी यांचा ताळेबंद बसत नसल्याचं समोर आलं आहे. या संदर्भात एसोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत सर्वोच्च न्य़ायालयास विनंती केली आहे.

‘निवडणूक आयोगाने पार पडलेलं मतदान आणि निकालातील आकडेवारी यांची पडताळणी करुनच निकाल जाहीर करावा’ असे निर्देश निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने द्यावेत अशी विनंती केली आहे.

हे वाचा :

EVM : तुमचं मत चोरीला जातंय काय…

नवलेवाडी EVM प्रकरणाचं सत्य…

EVM मशीनला शाई फासून निषेध करणारे सुनील खांबे ‘मॅक्समहाराष्ट्र’वर

EVM विरोधात भारतभर पदयात्रेवर निघालेला अवलिया…

याचिकाकर्त्यांनी लोकसभा निवडणूक 2019 संदर्भात निवडणूक आयोगाच्या निवडणूक प्रक्रियेवर चिंता व्यक्त केली आहे. निवडणूक आयोगाने निकालानंतर आयोगाची वेबसाईट आणि ‘माई वोटर्स टर्नआउट ऐप' या मधील माहितीमध्ये बदल केल्याबाबत आक्षेप नोंदवला आहे.

याचिकाकर्त्यांनी निवडणूक आयोगावरच प्रश्न उपस्थित केले आहेत. निवडणूक काळात माहितीत केलेले बदल हे काहीतरी गडबड आणि माहीती लपवण्याचा प्रयत्न असू शकतो. असं याचिकाकर्त्यांने म्हटलं आहे. यासाठी तज्ञ लोकांच्या टीमने याचिकाकर्त्यांसोबत विविध क्षेत्रात झालेलं मतदान आणि मतमोजणी यांच्यामध्ये फरक असल्याची आकडेवारी दिली आहे.

यासाठी तज्ञांनी 28 मे आणि 30 जून 2019 ला निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीचा आणि 'माय वोटर्स टर्नआउट ऐप' चा आधार घेतला आहे. या माहितीच्या आधारावर याचिकाकर्त्यांनी काही निष्कर्ष काढले आहेत...

हे वाचा :

साताऱ्यात EVM यंत्रात फेरफार! घड्याळाचं मत कमळाला…

महाराष्ट्रातील निवडणूका EVM वरच – मुख्य निवडणूक आयुक्त

EVM विरोधात सर्व विरोधी पक्षांची पत्रकार परिषद, पहा कोण काय बोलले ?

EVM विरोधातील ‘तात्काळ’ याचिका सर्वोच्च न्यायालयाने “यामुळे” फेटाळली

देशाच्या 542 लोकसभा मतदार संघापैकी 347 जागांवर मतदान आणि मतमोजणी यामध्ये विसंगती आढळून आली. एका मतापासून ते 1,01,323 मतांपर्यंत ही विसंगती आढळून आल्याचं तज्ञांनी आपल्या निष्कर्षात म्हटलं आहे.

6 लोकसभा मतदार क्षेत्रातील विजयी उमेदवारांची आकडेवारी पेक्षा विसंगत मतांच्या आकडेवारी ची संख्या अधिक आहे.

दरम्यान EVM द्वारे निवडणूका घेण्यासंदर्भात लोकसभा निवडणूक होण्यापुर्वी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल याचिका केली होती. मात्र, न्यायालयायाने ही फेटाळून लावली होती.

यापूर्वीही EVM बाबत सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. सत्ताधारी भाजप EVM मशिन हॅक करून निवडणूका जिंकत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यामुळे निवडणूका या बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी केली जात होती.

EVMबाबत आरोप

लोकसभा निवडणुकीपूर्वीही 21 विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेत EVM आणि VVPAT मधील 50 टक्के मतांच्या मोजणीची मागणी केली होती. तर, निकालानंतर शरद पवार, अजित पवार, तसंच काँग्रेसच्या काही नेत्यांनी EVMमध्ये गडबड असल्याचा आरोप केला होता.

Updated : 21 Nov 2019 1:33 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top