Home > Election 2020 > लॉकडाऊन: नीला सत्यनारायण यांनी स्पेशल चाईल्डबाबत लिहिलेलं भावनिक पत्र..

लॉकडाऊन: नीला सत्यनारायण यांनी स्पेशल चाईल्डबाबत लिहिलेलं भावनिक पत्र..

लॉकडाऊन: नीला सत्यनारायण यांनी स्पेशल चाईल्डबाबत लिहिलेलं भावनिक पत्र..
X

आज नीला सत्यनारायण यांचं मुंबईत कोरोनानं निधन झालं. देशाची एक उत्तम प्रशासकीय अधिकारी म्हणून सेवा बजावलेल्या नीला सत्यनारायण एक लेखिका देखील होत्या. त्यांनी महाराष्ट्र सारख्या पुरोगामी राज्याचं निवडणूक आयुक्त पद सांभाळलं. विशेष म्हणजे त्या राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त होत्या.

भारतीय प्रशासकीय सेवेबरोबरच कला, साहित्य, संस्कृती, गीत,संगीत अशा विविध प्रांतांमध्ये त्यांनी स्वतःचा अमीट ठसा उमटवला. त्यांना करोनाचा संसर्ग झाला होता. त्यांच्यावर सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान प्रकृती बिघडल्याने पहाटे चार वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सनदी अधिकारी असल्या तरी त्या जनमाणसात लोकप्रिय होत्या. त्यांनी अनेक कविता लिहिल्या, पुस्तकं लिहिली, त्यांच्या काही लेखनावर चित्रपट देखील निघाले. आत्तापर्यंत त्यांची ३५ पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्यात १२ ललित पुस्तकं, ९ काव्य संग्रह, काही प्रेरणा दायी, काही अनुवादित पुस्तकांचा समावेश आहे.त्यांच्या २ कथांवर चित्रपट निर्माण झाले आहेत. काही प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. १० संगीत सीडी प्रकाशित असून काही चित्रपट, दूरचित्रवाणी मालिकांसाठीही त्यांनी गीतलेखन केलं आहे.

प्रशासकीय क्षेत्राबरोबरच साहित्य क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या नीला सत्यनारायण यांनी आज अखेरचा श्वास घेतला. सध्या त्याचं लिखाण सुरु होतं. नुकतंच त्याचं 7 जून ला ‘मैत्र’ हे पुस्तक गुगल प्ले स्टोरला प्रसिद्ध झालं.

त्यांच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर त्यांनी लॉकडाऊन संदर्भात लिहिलेलं एक पत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं आहे... आज नीला सत्यनारायण आपल्या मध्ये नाहीत. मात्र, लॉकडाऊनमध्ये स्पेशल चाईल्ड असलेल्या मुलासंदर्भात निर्माण झालेले काही प्रश्न त्या उपस्थित करतात. लॉकडाऊनमुळे स्पेशल चाईल्ड च्या जीवनावर काय परिणाम झाला? ते या पत्रातून दिसून येतं.

लॉकडाऊनमध्ये स्पेशल चाईल्ड असलेल्या मुलांना घराच्या बाहेर नेणं आवश्यक आहे. अशा परिस्थितीत त्या मुलांना बाहेर कसं नेणार? एकटे असणाऱ्या मुलांच्या जीवनावर काय परिणाम झाला असेल असा प्रश्न या निमित्ताने त्यांनी उपस्थित केला आहे.

Updated : 16 July 2020 4:27 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top