गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांच्यात मोदींच्या भाषणाआधीच खडाजंगी
Max Maharashtra | 13 Oct 2019 10:54 PM IST
X
X
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज जळगाव येथे प्रचाराची पहिली सभा पार पडली. या पहिल्या सभे अगोदरच भाजप शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या बंडखोर उमेदवारी वरून गिरीश महाजन आणि शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.
जळगाव जिल्ह्यात शिवसेनेच्या उमेदवारांविरुद्ध भाजपच्या बंडखोरांनी मोठं आव्हान उभं केलं आहे. शिवसेनेच्या वाटेला आलेल्या मतदार संघात भाजपच्या नेत्यांनी बंडखोरी केलीय, यात जळगाव ग्रामीण, पाचोरा भडगाव, चोपडा, पारोळा एरंडोल या मतदार संघाचा समावेश आहे.
शिवसेनेचे राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मतदार संघात भाजपचे जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर अत्तरदे यांनी बंडखोरी केलीय, गुलाबराव पाटील यांना स्वपक्षातील नाराज नेत्यांना हाताशी धरून भाजपच्या बंडखोरांनी अडचणीत आणलंय,
त्यातच पाचोरा मतदार संघात शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांच्या विरुद्ध गिरीश महाजन यांचे जवळचे सहकारी अमोल शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी म्हणून उभा आहेत. चोपडा मतदार संघात शिवसेनेच्या लताताई सोनवणे यांच्या विरुद्ध भाजपचे जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनवणे यांनी आवाहन उभं केलंय.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांपेक्षा मित्रपक्ष असलेल्या भाजपच्या नेत्यांनीच शिवसेनेच्या उमेदवारांना अडचणीत आणलं आहे. भाजपचे उभे असलेले बंडखोर उमेदवार गिरीश महाजन यांचा शब्द खाली पडू दिला नसता. मात्र, जाणून बुजून बंडखोरांविरुद्ध काहीच कार्यवाही होत नाही, हीच नाराजी शिवसेना तसंच गुलाबराव पाटील यांना सलत आहे.
त्यामुळे आज मोदींच्या सभे अगोदर शिवसेनेने तीव्र नाराजी दिसून आली. सभेच्या डी-झोन मध्येच गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात सेना आणि भाजप यांच्यातील वाद आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Updated : 13 Oct 2019 10:54 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire