प्रकाश आंबेडकर यांना मोठा धक्का, गोपीचंद पडळकर यांनी वंचित आघाडी सोडली
Max Maharashtra | 26 Sept 2019 3:43 PM IST
X
X
धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी ऐन विधानसभा निवडणुक तोंडावर असताना वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी दिल्याने मोठा धक्का बसला आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळण्याच्या दृष्टीने काम होण्यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडीचं काम थांबवत असल्याचं त्यांनी सांगितलं. पडळकर येत्या दोन दिवसात कार्यकर्ता मेळाव्यात आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.
वंचित बहुजन आघाडीच्या महासचिव पदाचा राजीनामा दिल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलता "वंचित मध्ये माझे कोणाशीही कसलेच वाद नाहीत. भाजप सरकार धनगर समाजाच्या आरक्षणबाबत सकारात्मक भूमिका घेत असल्याने समाजाकडूनच भाजपासोबत जाण्याबाबत दबाव येत आहे मात्र, आज याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही,” असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे. वंचितची साथ सोडल्यानंतर आता पडळकर यांची भाजपमध्ये घरवापसी होण्याची चिन्ह दिसून येत आहेत.
https://youtu.be/uuD5jppvuQw
Updated : 26 Sept 2019 3:43 PM IST
Tags: Dhanagar Aarkshan Gopichand Padalakar PRAKASH AMBEDKAR vanchit bahujan aaghadi गोपीचंद पडळकर धनगर आरक्षण भाजप वंचित बहुजन आघाडी
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire