सभा संपताच पंकजा मुंडेंना आली चक्कर...!
Max Maharashtra | 19 Oct 2019 6:25 PM IST
X
X
आज विधानसभा निवडणुकीचा प्रचार थंडावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanavis) यांनी त्यांच्या नागपूर पश्चिम मतदारसंघातून रॅली काढत लोकांना मतदानाचं आवाहन केलं. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार(Ajit Pawar) , खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी एकत्रीत सभा घेत प्रचाराचा शेवट केला.
सहभाग निधी साठी इथे क्लिक करा
- पंकजा मुंडेंना धनंजय मुंडेंचं तगडं आव्हान असल्यानं पंतप्रधानांनी सभा घेतली का?
- बीडमधील राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
- पंकजा मुंडेंचा निवडणुकीच्या तोंडावर नवा डाव
तर दुसरीकडे मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठाणे इथं सभा घेत प्रचाराची सांगता केली. तर सध्या राज्याचं लक्ष लागलेल्य़ा परळी (Parali) मतदार संघातून राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी भाषण केलं.
https://youtu.be/P8NmK1AOJA8
पंकजा मुंडे यांनी यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली. 'मी राजा आहे. तर धनंजय मुंडे प्यादी आहे.' असं म्हणत परळीच्या जनतेला मतदान करण्याचं आवाहन केलं.
राजकारणात होणारा विरोध पाहता राजकारण सोडून जावसं वाटतं असं देखील पंकजा यांनी यावेळी सांगितलं. मात्र, भाषण संपताच पंकजा मुंडे यांना चक्कर आली. आता त्यांची प्रकृती ठीक असल्याचं आमच्या प्रतिनिधींनी कळवलं आहे.
Updated : 19 Oct 2019 6:25 PM IST
Tags: #pankaja munde bjp bsp congress CPI Maharashtra Election 2019 mns ncp RSP Shivsena vba कॉंग्रेस बसपा भाजप भारतीय कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी कॉंग्रेस रासप वंचित बहुजन आघाडी शिवसेना
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire