चीनमध्ये कोरोनाचा तांडव; मुंबई पुन्हा कोरोनाचा विळख्यात सापडेल का?
X
सध्या चीनमध्ये कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत असल्यामुळे एका दिवसात हजारो रुग्णांचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे मुंबईत पुन्हा कोरोनाच संकट येईल का? यांसंदर्भात राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार यांनी महत्त्वाच विधान केलं आहे. चीनच्या सध्याचे वातावरण पाहता भारतीयांनी घाबरून जाण्याची गरज नाही. असे कोरोनासंदर्भातील सल्ला देणाऱ्या राष्ट्रीय तांत्रिक सल्लागारांनी केले आहे. २०२० नंतर कोरोना रुग्णांची संख्या कमी होती.
२०२२ च्या शेवटपर्यंत कोरोनाच्या संदर्भात भारताकडे लक्ष देण्यात आले आहे. तसेच कोरोनाचा त्रास यापूर्वी मोठ्या प्रमाणात भारतीय नागरिकांना झाला होता. मोठ्या प्रमाणात मृत्यू झालेच चित्र स्पष्ट नाही असे देखील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागाराने भूमिका मांडली आहे. जिनोम सिक्वेन्सिंगसंदर्भात सर्तक होऊन भारताला काम करावं लागणार आहे. त्यामुळे मुंबई अद्यापही कोरोनाचा धोका नाही. अस सध्याच चित्र स्पष्ट झालं आहे. बीए-४ आणि बीए-५ नव्या व्हेरिएंटमुळे सध्या अमेरीकेला आणि चीनला धोका आहे. परंतू भारतात त्याचा प्रसार झाला नाही. त्यामुळे चीनमध्ये एका दिवसात हजारो रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
२०२२ मध्ये सध्या कोरोनाच्या बाबतीत कोणत्याही रुग्ण मुंबईत सापडत नसल्यामुळे मुंबईकरांना घाबरुन जाण्याचे कारण नाही. भारतात सध्या बऱ्याच यंत्रणा कार्यरत असल्यामुळे योग्यवेळी परिस्थीत हाताळत असताना कोणतीच अडचण येणार नसल्याची माहीती कोरोना राष्ट्रीय तांत्रिक सल्लागारांनी दिली. कोरोनाच्या संदर्भातील परदेशाती भयानक आकडेवारी समोर आली आहे. सध्या अमेरिकेत-३०८, जापान-२३१, ब्राझील-२१६, जर्मनी-२०१, फ्रान्स-१३०, ही आकडेवारी समोर आली आहे. चीनमध्ये रुग्णालयात कोरोना उपचारांसाठी रुग्णांना सध्या बेड मिळत नसल्याचे भयान वास्तव समोर आले आहे.