Home > Coronavirus > COVID चा नवीन 'Mu' वेरिएंट, लसीकरणालाही करु शकतो प्रभावहीन: WHO

COVID चा नवीन 'Mu' वेरिएंट, लसीकरणालाही करु शकतो प्रभावहीन: WHO

जगाची चिंता वाढवणारा COVID चा नवीन 'Mu' वेरिएंट, लसीकरणालाही करु शकतो प्रभावहीन: WHO

COVID चा नवीन Mu वेरिएंट, लसीकरणालाही करु शकतो प्रभावहीन: WHO
X

New Covid Variant: जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोव्हिड च्या नवीन संक्रमणाची माहिती जगाला दिली आहे. या नवीन Variant चं नाव "Mu" असं आहे. जानेवारी 2021 ला कोलंबियामध्ये हा Variant आढळला होता.

या Variant ला वैज्ञानिक भाषेत B.1.621 ने ओळखलं जातं. WHO संघटनेने मंगळवारी आपलं साप्ताहिक बुलेटिन जारी केलं आहे. यामध्ये या Variant ची माहिती देण्यात आली आहे.

त्यामध्ये डब्ल्यूएचओ ने हा Variant लसीला देखील बेअसर करण्याचे संकेत दिले आहेत. WHO ने या Variant ला समजून घेण्यासाठी अधिक अभ्यास करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.

"Mu'' Variant मध्ये म्यूटेशन चा एक constellation आहे. जो लसीपासून वाचण्याचे संकेत आहे." त्यामुळं हा नवीन Variant पुढील काळात जागतीक आरोग्यासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. हा Variant डेल्टा Variant पेक्षा अधिक वेगाने संक्रमीत होण्याची भीती आहे. त्यामुळं जगासाठी हा variant चिंतेचं कारण बनला आहे.

WHO च्या माहितीनुसार कोव्हिड 19 ला कारणीभूत ठरणारे SARS-CoV-2 सहीत सर्व व्हायरस एका ठरावीत वेळेला म्यूटेंट होतात. यातील बहुतेक म्यूटेशनचा व्हायरसच्या गुणांवर फारसा प्रभाव पडत नाही. मात्र, काही म्यूटेशन व्हायरसच्या गुणधर्मामध्ये मोठ्या प्रमाणात बदल करतात. बदल झालेल्या गुणधर्मामुळे संक्रमणाचा दर अधिक वेगाने वाढतो. तसंच लसीकरण, ओषधांच्या प्रभावाला देखील हा नवीन variant कमी करतो.

WHO ने नवीन चार कोविड -19 variant ची माहिती दिली आहे. ज्यामध्ये अल्फा, 193 देशांमध्ये आढळला आहे. डेल्टा variant 170 देशात आढळला आहे. तर म्यू variant कोलंबिया मध्ये आढळल्यानंतर, म्यू अन्य दक्षिण अमेरिकी देशात आणि यूरोप मध्ये आढळून आला आहे.

Updated : 1 Sept 2021 5:11 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top