मुंबईमध्ये आढळला कोरोनाच्या XE व्हेरिएंटचा रुग्ण
X
नुकतेच राज्य सरकारने कोरोनाचे (Corona)सर्व निर्बंध हटवले.मास्कही ऐच्छिक केला.याच पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आली आहे.ब्रिटनमध्ये (britan)आढळलेल्या एक्सई या कोरोनाच्या नव्या उपप्रकराने बाधित असलेला एक रुग्ण मुंबईत सापडला आहे.
मुंबई पालिकेने (bmc)नुकत्याच जाहिर केलेल्या जिनोम सिक्वेन्सिंगमध्ये हे निदर्शनास आले.भारतातील हा एस्कईचा (XE) पहिसलाच रुग्ण आहे. हा रुग्ण दक्षिण अफ्रिकेचा नागरिक आहे.हा रुग्ण महिन्याभरापूर्वी म्हणजे २ मार्चला कोरोनाबाधित होता.त्याला कोणतीही लक्षणे नव्हती.दुसऱ्याच दिवशी म्हणजे ३ मार्चला कोरोनामुक्तही झाला.गेल्या काही महिन्यात मुंबईत रुग्णसंख्या वाढलेली नाही.त्यामुळे याच्या विषाणूच्या प्रकाराचा प्रसार तीव्रतीने झालेला नाही आणि हा विषाणूचा प्रकार निश्चितच धोकादायक नाही, हे यावरून दिसून येते.
ही महिला वेशभूषाकार असून चित्रीकरणाच्या समूहामध्ये सहभागी होती. ही महिला फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेहून भारतात आली होती. त्यावेळी तिला करोनाची बाधा झालेली नव्हती. परंतु चित्रीकरणामध्ये नियमितपणे केल्या जाणाऱ्या चाचण्यांमध्ये २ मार्चला ती बाधित आढळली. तिचे नमुने चाचणीसाठी पाठविले असता एक्सईची बाधा झाल्याचे आढळले आहे. ३ मार्चचला दिलेल्या नमुन्यामध्ये ही महिला करोनामुक्त झाल्याचेही आढळले आहे. या महिलेने लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या होत्या आणि ती लक्षणे विरहित होती.
ब्रिटनमध्ये एक्सई हा विषाणूचा उपप्रकार जानेवारीमध्ये आढळला आहे. जगभरात या विषाणूचे ६०० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. हा विषाणू ओमायक्रॉनचे बीए.१ आणि बीए.१ या उपप्रकाराचे उत्परिवर्तन होऊन निर्माण झाला.