Home > Coronavirus > कोरोना JN1 मध्ये वाढ ; टास्क फोर्सच्या बैठकीत घेण्यात आले 'हे' निर्णय

कोरोना JN1 मध्ये वाढ ; टास्क फोर्सच्या बैठकीत घेण्यात आले 'हे' निर्णय

कोरोना JN1 मध्ये वाढ ; टास्क फोर्सच्या बैठकीत घेण्यात आले हे निर्णय
X

Covid Task Force : देशात कोरोना (covid 19) झपाट्याने वाढत आहे. त्याचबरोबरीने राज्यातही कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. कोरोनावर नियंत्रण राखण्यासाठी राज्य सरकारकडून टास्क फोर्सच्या माध्यमातून विशेष खबरदारी घेत आहे.

कोरोना आटोक्यात आणण्यासाठी टास्क फोर्सही स्थापन करण्यात आली आहे. शुक्रवारी डॉ. रमण गंगाखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली या टास्क फोर्सची बैठक झाली. या बैठकीत सहव्याधी असलेल्या कोरोना रुग्णांना रेमेडिसिविर (Advises For Remdesivir) देण्याचा सल्ला टास्क फोर्सने दिला. कोरोना बरोबरच शुगर, बीपी अशा सहव्याधी असलेल्या लोकांना रेमेडिसिविर इंजेक्शन उपयुक्त असल्याचे टास्कफोर्सने स्पष्ट केलं आहे. बैठकीत कोरोना रुग्णांना (corona patients) कोणते औषधे आणि इंजेक्शन देण्यात यावे? याबाबत मार्गदर्शन सूचना जारी करण्यात आल्या.

JN1 लक्षणे

कोरोनाचा नवीन व्हेरिएंट कोव्हिड जे.एन 1 JN1 covid variant झपाट्याने वाढतो आहे. कोव्हिड जे. एन 1 लक्षणे ILI किंवा SARI या प्रकारात येऊ शकतात. यात ILI ची लक्षणे ताप, सर्दी, खोकला आणि फ्ल्यू सारखे लक्षणे आहेत. तर SARI झालेल्या रुग्णांमध्ये ILI लक्षणांसोबत श्वास घेण्यास त्रास होणे, दम लागणे यांसारखी लक्षणे दिसून येतात. त्यानुसार, SARI झालेल्या रुग्णांना पाच दिवसांसाठी रेमडिसिविर देण्याचा सल्ला टास्क फोर्सने दिला आहे.

अँटीबायोटिक्सबाबत दिला हा सल्ला

जेएन1 व्हेरीयंटचा प्रसार हवेतून

टास्क फोर्स च्या बैठकीत अँटिबायोटिक्सवर बोलतांना त्यांनी स्पष्ट केले की, सर्व रुग्णांना सरसकट अँटिबायोटिक्स देऊ नये. आवश्यकता असेल तरच अँटिबायोटिक्सचा वापर करा. शिवाय, कोरोनाची (covid 19) साथ सुरुवातीला वाढली तेव्हा कोरोनामुळे मृत्यू झालेला लोकांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येत नव्हता. मात्र आता कोव्हिड रुग्णांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांना देण्याचे आवाहन टास्क फोर्सच्या अध्यक्षांनी केले आहे. कोरोना रुग्णांच्या सरसकट रक्तचाचण्या करण्यात येऊ नयेत. वैद्यकीय सल्ल्यानुसार आवश्यक त्या चाचण्या करव्यात. रुग्णांची डिस्चार्ज करताना आरटीपीसीआर टेस्टची आवश्यकता नाही. जेएन1 व्हेरीयंट हवेतून पसरत असल्याचे या बैठकीतून सांगण्यात आले आहे.

Updated : 13 Jan 2024 10:26 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top