Covid Vaccine : अमेरिकेतील लसीला आता भारतात मान्यता
X
देशात कोरोनावरील लसींचा तुटवडा असताना लसीकरणाचा वेग वाढवण्याची घोषणा सरकारने केली आहे. पण आता लसीकरणाच्या मोहीमेला आणखी बळकटी मिळेल अशी बातमी आता आली आहे. अमेरिकेतील मॉडर्ना कंपनीच्या कोरोनावरील लसीच्या वापराला भारतात परवानगी देण्यात आली आहे. मर्यादित स्वरुपात आपत्कालीन वापरासाठी औषध महानियंत्रकांनी (DCGI) यांनी मंजुरी दिली आहे. या लसीच्या आयातीसाठी सिप्ला कंपनीला परवानगी देण्यात आली आहे. यामुळे देशात आता कोरोनाच्या प्रतिबंधासाठी कोव्हॅक्सिन, कोव्हिशिल्ड, रशियाची स्पुटनिक आणि अमेरिकेचे मॉडर्ना या ही लस उलब्ध होणार आहे.
सध्या केंद्र् सरकारने १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे ध्येय ठरवले आहे. केंद्रीय औषध प्रयोगशाळेत या लसीची आधी तपासणी केली जाईल आणि मग त्यानंतर ही लस भारतात लसीकरणासाठी उपलब्ध होणार आहे. सध्या देशात दोन स्वदेशी आणि दोन परदेशी लसींना मान्यता मिळाली आहे. आता येत्या काळात ब्रिटनमधील फायझरच्या लसीलाही मान्यता मिळते का
पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मॉडर्ना लसीची परिणामकारता ही भारतातील कोव्हीशिल्ड, कोव्हॅक्सन तसेच रशियाच्या स्पुटनिकपेक्षाही जास्त असल्याचे सांगितले जाते.