मास्क न लावणाऱ्यांकडून BMC ने वसूल केले 49 कोटी
मास्क न लावणाऱ्यांकडून BMC ने वसूल केले 49 कोटी
टीम मॅक्स महाराष्ट्र | 3 April 2021 4:54 PM IST
X
X
राज्यात दररोज 45 हजारांपेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. मुंबईत देखील दररोज 7 ते 8 हजार कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहे. मुंबईतील सक्रीय रुग्णांची सद्यस्थिती पाहता 1 मार्चला 9 हजार 690, 15 मार्चला 14 हजार 582, 25 मार्चला 33 हजार 961, 1 एप्रिलला 55 हज़ार 005 अशा पद्धतीने वाढतच आहे. कोरोनाची ही रुग्ण संख्या झाली आहे. कोरोना वाढण्याचे मुख्य कारणांपैकी एक कारण म्हणजे मास्क न लावणे.
मास्क लावला तर कोरोना रुग्णांची संख्या निश्चित कमी होईल. मात्र, मास्क न लावणाऱ्या मुंबईकर नागरिकांकडून 2 एप्रिल, 2021 पर्यंत एकूण 49 कोटी रुपये दंड म्हणून आकारण्यात आला आहे. हा आकडा चिंताजनक आहे. मुंबईत कोरोनाला आटोक्यात आणायचं असेल आणि लॉकडाऊन पुन्हा लावायचं नसेल तर नागरिकांनीच स्वतःच सजग होऊन मास्क लावणं गरजेचं आहे.
Updated : 3 April 2021 4:55 PM IST
Tags: BMC BMC mumbai
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire