Home > Coronavirus > #Covid19Vaccine : लसींचा तुटवडा कायम, मुंबईत सलग तीन दिवस लसीकरण बंद

#Covid19Vaccine : लसींचा तुटवडा कायम, मुंबईत सलग तीन दिवस लसीकरण बंद

#Covid19Vaccine : लसींचा तुटवडा कायम, मुंबईत सलग तीन दिवस लसीकरण बंद
X

केंद्र सरकारने कोरोनावरील लसीकरणाची जबाबदारी राज्यांकडून स्वत:कडे घेतली, पण अजूनही लसींच्या तुटवड्याची समस्या मिटलेली नाही. राज्यांना लसीकरणाचे नियोजन करता येत नसल्याचे सांगत केंद्राने लसीकरण मोहीम ताब्यात घेतली आहे. पण राज्यात अजून लस तुटवडा जाणवत आहे. यामुळेच मुंबईमध्ये 9 ते 11 जुलै असे सलग तीन दिवस लसीकरण बंद आहे. मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार लस उपलब्ध नसल्याने 10 जुलै रोजी लसीकरण केंद्रे बंद राहणार आहेत. तर 11 जुलै रोजी रविवारची सुटी असल्याने लसीकरण केंद्रे बंद असतील. त्याआधी 9 जुलै रोजी म्हणजे शुक्रवारी सुद्धा लस तुटवड्यामुळे लसीकरण केंद्र बंद होती.

"मुंबईकरांनो, १० जुलै, २०२१ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका व शासकीय लसीकरण केंद्रांमध्ये लसीकरण केले जाणार नाही. तसेच ११ जुलै रोजी नियमित साप्ताहिक सुट्टी म्हणून लसीकरण बंद राहील. आपल्याला होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. लसीकरण प्रक्रियेच्या पुढील सूचना आम्ही देत राहू."

अशी माहिती महापालिकेने दिली आहे. दरम्यान मुंबईत 9 जुलै रोजी कोरोनाचे नवीन ६०० रुग्ण आढळले आहेत. तर २४ तासात बरे झालेले रुग्णांची संख्या ५६६ आहे. रुग्ण बरहे होण्याचा दर ९६% आहे. सध्या मुंबईतील एक्टिव्ह रुग्णांची ७ हजार ७३१ एवढी झाली आहे. तर रुग्ण दुपटीचा दर ८९२ दिवस आहे.

Updated : 10 July 2021 7:15 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top