Home > Coronavirus > मुंबईवर डेल्टाचे संकट, १२८ जणांना लागण

मुंबईवर डेल्टाचे संकट, १२८ जणांना लागण

मुंबईवर डेल्टाचे संकट, १२८ जणांना लागण
X

मुंबईसह राज्यात कोरोनाचे रुग्ण कमी होत असताना आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईत कोरोनाच्या डेल्टा विषाणूचे तब्बल १२८ रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये विषाणू तपासणी मशीनमध्ये मुंबईमधील 188 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 128 नमुने हे डेल्टा प्लसचे विषाणूचे असल्याचे समोर आले आहेत, त्याचप्रमाणे इतर राज्यात आढळत असलेल्या विषाणूचे नमुनेसुद्धा यामध्ये सापडले आहेत, अशी माहिती महापौर पेडणेकर यांनी दिली आहे.

मुंबईकरांना खबरदारी घेण्याचे आवाहन महापौरांनी केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील नागरिकांनी नियम पाळले नाही तर पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल असा इशारा आधीच दिला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी राज्य सरकारने दिलेल्या नियमावलीचे पालन करावे अन्यथा अशाप्रकारे रुग्णसंख्या वाढत राहिली तर पुन्हा लॉकडाऊन शिवाय पर्याय नसेल, अशा इशाराही किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे.

२५ ऑगस्टला मुंबईत एकूण ३४३ रुग्ण आढळले होते. तर २४ तासात २७२ रुग्ण बरे झालेले होते. आतापर्यंत मुंबईत ७२०७५० रुग्ण बरे झाले आहेत. सध्या कोरोनाचे मुंबईत २८५५ एक्टिव्ह रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर १८८४ दिवस असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे,.

Updated : 26 Aug 2021 7:39 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top