Home > Coronavirus > काेराेना प्रतिबंधक लसीकरणामध्ये भारताचा उच्चांक

काेराेना प्रतिबंधक लसीकरणामध्ये भारताचा उच्चांक

काेराेना प्रतिबंधक लसीकरणामध्ये भारताने आज एक उच्चांक गाठला आहे. एका दिवसात तब्बल  १ कोटी डोस देण्याचा उच्चांक भारताने केला आले.

काेराेना प्रतिबंधक लसीकरणामध्ये भारताचा उच्चांक
X

नवी दिल्ली : काेराेना प्रतिबंधक लसीकरणामध्ये भारताने आज एक उच्चांक गाठला आहे. एका दिवसात तब्बल १ कोटी डोस देण्याचा उच्चांक भारताने केला आले. दरम्यान याबाबत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने जगासमोर एक नवा आदर्श घालून दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आतापर्यंत देशात ६२ काेटी डाेस देण्यात आले असून देशाच्या अर्ध्या लाेकसंख्येला किमान एक डाेस देण्यात आला असल्याची माहिती आहे. डिसेंबरपर्यंत देशातील प्रत्येक नागरिकाचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे. त्यासाठी दरराेज एक काेटी डाेस देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. शुक्रवारी हे लक्ष्य गाठण्यात यश आलंय. काल उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक २८ लाख डाेस देण्यात आल्याची माहिती आहे. तर महाराष्ट्रात ९ लाख ९० हजार डाेस देण्यात आले आहे.

Updated : 28 Aug 2021 8:28 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top