स्वप्निल लोणकर आत्महत्या: MPSC च्या विद्यार्थ्यांचा प्लान 'बी' रेडी का नसतो?
X
स्वप्निल लोणकर च्या आत्महत्येनंतर MPSC चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मानसिक तणावाचा मुद्दा समोर आला. खरं तर आपल्याकडे लोकांमध्ये या विषयाबाबत फारसं गांभीर्य असल्याचं दिसून येत नाही. मात्र, याबाबत बोलणं गरजेचं आहे. ही बाब लक्षात घेता. विद्यार्थ्यावर आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलण्याची वेळ का आली?
या संदर्भात आम्ही माजी सनदी अधिकारी महेश झगडे यांच्यासह परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी श्रद्धा बागराव विट्ठल साळुंखे, विष्णू चव्हाण यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत विद्यार्थी भारती च्या मंजिरी धुरी, छात्र भारती चे सतीश बनसोडे देखील सहभागी झाले होते.
या चर्चेमध्ये MPSC च्या विद्यार्थ्यांचा 'बी' प्लान का रेडी नसतो? यासह विद्यार्थ्यांवर येणारा आर्थिक दबाव, राजकीय इच्छा शक्तीचा अभाव, मुलींना MPSC ची परीक्षा देताना येणारा तणाव या सर्व मुद्द्यांवर चर्चा केली. नक्की पाहा...