महाराष्ट्रात हाहाकार : नद्यांना महापूर, प्रशासनाचं दुर्लक्ष
X
महाराष्ट्रात मुसळधार पावसाने आणि नद्यांच्या महापूरांनी हाहाकार माजवला आहे. नद्यांना आलेल्या महापूरामुळे सर्वसामान्यांने जनजीवन विस्कळीत झालं आहे. राज्यात दरड कोसळणे, घर, इमारती कोसळणे, जागोजागी पाणीच-पाणी साचणे यामुळे सर्वसामान्य मेटाकुटीला आला आहे. कमी वेळात पडणाऱ्या पावसामुळे नद्यांना महापूर का येत आहे? पाण्याचे योग्य नियोजन, कचऱ्याचे योग्य पद्धतीने निचरा करणे, जलद गतीने होणारे शहरीकरण या सगळ्या बाबी या परिस्थितीस जबाबदार आहे का? प्रशासनाचं नियोजन कुठं चुकतंय? यासंदर्भात मॅक्स महाराष्ट्रने समग्र नदी परिवारचे अध्यक्ष आणि पर्यावरण अभ्यासक सुनिल जोशी यांच्या बातचीत केली.
सुनिल जोशी सांगतात की, राज्यातलं हे महाविदारक चित्र पाहून अनेकांना प्रश्न पडतोय की अशी परिस्थिती का उद्भवली? कमी वेळात प्रचंड पाऊस का पडतोय? कोकण, कोल्हापूर, सांगली, मुंबई याठिकाणी नद्यांना आलेल्या पूरामुळे होत्याचं नव्हतं झालं आहे. अनेकांची संसार पाण्याखाली आली आहेत. याला जबाबदार प्रशासनासह, सर्वसामान्यही तितकेच आहेत. वारंवार हवामान, तापमानात होणाऱ्या बदलांमुळे नैसर्गिक संकंटाना तोंड द्यावं लागत आहे. या पूरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
जर आपण पाहिलं पर्यावरणाचा ऱ्हास या काही दिवसात मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं पाहायला मिळत आहे. अमेरिका, मध्य युरोप, चीन सारख्या बलाढ्य देशातही महाप्रलय येऊ लागले आहेत.
महाराष्ट्रातील परिस्थिती पाहता राज्यकर्त्यांनी, धोरणकर्त्यांनी कोणत्याही धोरणाविषयक नियोजन ठरवताना सर्वसामान्यांना घेतलं पाहिजे. त्यांचे विचार या धोरणात का नसते? असा सवाल जोशी यांनी सरकारला केला आहे. तसेच हवामान विभागाने होणाऱ्या बदलांची माहिती प्रशासनापर्यंत पोहचवणं आणि प्रशासनानही त्यावर तात्काळ नियोजन करावं. मात्र या सगळ्यात सूसत्रता नाही. समन्वयाचा अभाव मोठ्याप्रमाणात पाहायला मिळतो. या महापूरातून धडा घेत येणाऱ्या दिवाळी पर्यंत असलेल्या पावसाचं नियोजन सरकार कशापद्धतीने करणार आहे . या सगळ्या परिस्थितीवर संशोधन होणार आहे का? शेतकऱ्यांना कशापद्धतीने कृषी विभाग मार्गदर्शन करणार आहे. पर्यावरणाची विस्कटलेली चैन सुरळित करण्यासाठी प्रत्येकांने जबाबदारीने पर्यावरणाची काळजी घेणं गरजेचं आहे.