संघोट्यांनी मराठा-मराठेतर विभाजन केले: बी जी कोळसे पाटील
सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती मिळाल्यानंतर महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांचे(EWS) आरक्षण दिले आहे त्या विरोधात मराठा समाजातील विविध संघटना आणि व्यक्तीकडून विविध दावे केले जात असताना उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी जी कोळसे पाटील यांनी मराठा समाजाचे खरे शत्रू कोण? हे व्हिडिओच्या माध्यमातून पुढे मांडले आहे.
टीम मॅक्स महाराष्ट्र | 27 Dec 2020 1:28 PM IST
X
X
व्हिडीओमधून भूमिका मांडताना कोळसे-पाटील यांनी स्वतःच्या झोपडीचा फोटो प्रसिद्ध केला असून ते म्हणाले,
मी जिथून आलोय ती झोपडी बघा आणि विचार करा कि मी मराठा आरक्षणाचा विरोधक कसा असू शकेल? मला खुशाल शिव्या द्या.परंतु मराठा समाजाच्या आरक्षणाचे खरे शत्रु कोण? माझ्या, मराठा बहिणी भावांना,नेत्यांना नव्हे, एक आवाहन. आरक्षण या विषयावर माझा हा व्हिडिओ जरा काळजीपूर्वक ऐकां.महाराष्ट्राचं मराठा आणि मराठेतर यशस्वीपणे विभाजन संघोट्यानी केलंय.परंतु त्यांनी मराठ्यांच्या हाती दिला आहे धतुरा.जरा विचार करा. ही नम्र विनंती आहे.
Updated : 27 Dec 2020 1:28 PM IST
Tags: Maratha samaj maratha reservation BG Kolse Patil supreme court of india maharashtra government shvisena uddhav thackeray
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire