Home > Video > दाभोलकर त्यांच्या अखेरच्या भाषणात काय म्हणाले होते?

दाभोलकर त्यांच्या अखेरच्या भाषणात काय म्हणाले होते?

दाभोलकर त्यांच्या अखेरच्या भाषणात काय म्हणाले होते?
X

डॉ. नरेंद्र दाभोलकर हे नाव ऐकलं की आपल्या डोळ्यांसमोर त्यांच्या हत्येच्या बातम्या येतात. आणि हीच भावाना बदलण्यासाठी फ्रेंड्स ऑफ दाभोलकर समुहाने दाभोलकर कला प्रदर्शनाचं आयोजन केल्याचं आयोजक दीप्ती राऊत सांगतात. ते सांगताना त्या दाभोलकरांच्या चळवळी, मोहिमा या लोकशाही मुल्ये तसेच समता, बंधूता जपण्यासाठी होत्या हे देखील आवर्जून सांगतात.

यासोबतच आज आपण अनेक स्त्री हक्काच्या, समानतेच्या गोष्टी करताना अनेकांना पाहतो. त्याच्या बातम्या होताना पाहतो. पण याच महिलांना शनि शिंगणापूर मंदीरात प्रवेश मिळावा म्हणुन दाभोलकरांनी ३० वर्षांपुर्वी आंदोलन केलं होतं. शिवाय आज आपण पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करतो पण त्याची सुरूवात दाभोलकरांनी १९९१ सालीच केली होती हे प्रकर्षाने आयोजक दीप्ती राऊत सांगतात.

Updated : 1 Nov 2022 7:39 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top