हिंदू-मुस्लिम ऐक्याची अनोखी ईद
देशात वातावरण दुषित केले जात असताना पुणे शहरात अनोख्या पध्दतीने हिंदू मुस्लिम ऐक्याचे ईद पहायला मिळाले. याच अनोख्या ईदचा आढावा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी गौरव मालक यांनी घेतला आहे.
गौरव मालक | 3 May 2022 7:41 PM IST
X
X
देशभरात ईद उत्साहात साजरी केली जात आहे. त्यातच दुसरीकडे सर्वत्र धार्मिक वातावरण दुषित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यापार्श्वभुमीवर पुणे शहरातील कोथरूड परिसरात पठाण चाचा यांच्या घरी हिंदू मुस्लिम ऐक्याचे अनोखे चित्र पहायला मिळाले. पठाण चाचा यांच्या घरी हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येत ईद साजरी केली. तर हा उपक्रम आम्ही पुर्वजांपासून जपत असल्याची भावना पठाण चाचा यांनी व्यक्त केली. याबरोबरच मानवतेपेक्षा जगात कुठलाच धर्म श्रेष्ठ नसून माणसाने माणूस म्हणून जगले पाहिजे अशी भावना याठिकाणी लोकांनी व्यक्त केली. तर याच अनोख्या रमजान ईदचा आढावा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी गौरव मालक यांनी घेतला आहे.
Updated : 3 May 2022 7:42 PM IST
Tags: Hindu Hindu Muslim EId ramjan Eid
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire