समान नागरी कायदा नको, समान नागरी हक्क हवा - डॉ. शमशुद्दीन तांबोळी
X
गुजरात सरकारने समान नागरी कायद्याचा (Uniform civil code) अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली. त्यामुळे समान नागरी कायद्यावर पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. त्यापार्श्वभुमीवर आम्हाला समान नागरी कायदा नको आधी समान नागरी अधिकार द्या, असं मत मुस्लिम सत्यशोधक समाजाचे (muslim satyashodhak samaj) डॉ. शमशुद्दीन तांबोळी यांनी व्यक्त केले.
शमशुद्दीन तांबोळी म्हणाले की, गुजरात निवडणूक डोळ्यासमोर येताच समान नागरी कायद्याबद्दल चर्चा सुरु झाली. आम्हाला समान नागरी कायदा हवा आहे. पण सध्या ज्या पध्दतीने धार्मिक धृवीकरणाचा प्रकार सुरु आहे. त्यामुळे सध्या समान नागरी कायद्यासाठी योग्य वेळ नसल्याचे तांबोळी म्हणाले. याबरोबरच समान नागरी कायदा हा धार्मिक धृवीकरणाशिवाय व्हावा, असं मत डॉ. तांबळी यांनी व्यक्त केले.
समान नागरी कायदा ज्यावेळी देशभरात लागू करण्यात येईल. त्यावेळी त्यावर जनतेचं मत घ्यावं. संसदेत चर्चा व्हावी. तसेच साधक-बाधक चर्चेनंतरच समान नागरी कायदा लागू करावा, असं मत डॉ. शमशुद्दीन तांबोळी यांनी व्यक्त केले.