महात्मा गांधी नंतर भारत समजून घेण्यासाठी 'हि' यात्रा – ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले
X
भारत जोडो यात्रा ७ नोव्हेंबरला महाराष्ट्रात आली, त्यानंतर अनेक लोकांची गर्दी या यात्रेत पाहायाला मिळाली. परंतू २०१४ रोजी निवडणूकीच्या पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीडियाला हाताशी धरून टीमच्या माध्यामातून जहिरात आणि प्रपोगंडा केला होता. स्वताची चांगली प्रतिमा उभारण्याच काम करण्यात नरेंद्र मोदी यांनी केले होते तसेच राहुल गांधी यांच्यावरती टीका करुन त्यांची प्रतिमा कशी वाईट आहे. हे दाखवण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी केले होते. तसेच भारत जोडो यात्रेचा प्रभाव पाहता राहुल गांधी यांची यात्रा इमेज बिल्डिंग नसून भारत बिंल्डिंग यात्रा आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना स्वताची
इमेज मीडियामार्फत उभारण्यासाठी जहिराती, प्रपोगंडा, इत्यादी करता आले असते पण राहुल गांधी यांनी तसे केले नाही. लोकांना प्रश्न विचारून त्यांच्याशी संवाद साधत आहेत. महात्मा गांधींच्या नंतर भारत समजून घेण्यासाठी आणि जोडण्यासाठी निघालेली ही अभूतपूर्व यात्रा आहे. ज्यात सर्व प्रकारचे लोक अगदी काँग्रेस विरोधी देखील सहभागी झाल्याचे पाहायाला मिळत आहे.