रमाबाई हत्याकांडाची 24 वर्ष पूर्ण, न्याय कधी मिळणार? श्याम गायकवाड
X
अनुसूचित जाती जमातीवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराबद्दल या देशातील व्यवस्था उदासीन किंवा अन्यायकारक आहे. अमेरिकेत फ्लॉयड वर झालेल्या अत्याचाराचे पडसाद जगभर उमटले आहेत.
अमेरिकेतील प्रशासन लगेच सक्रिय होते आणि फ्लॉयडच्या अत्याचाराबाबत आरोपींना 26 वर्ष, दोन जन्मठेपेची शिक्षा होते. मात्र, घाटकोपर येथील रमाबाईनगर आंबेडकर नगर हत्याकांडाला 24 वर्ष पूर्ण होऊन 25 वे वर्ष सुरू झाले तरी यातील प्रमुख आरोपी पोलिस निरीक्षक मनोहर कदम आजही मोकळा आहे. आजही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना कुणी केली? तो आरोपी देखील अजूनही पकडला गेलेला नाही.
अमेरिकेतील न्याय व्यवस्थेने ब्लॅक लाईफ मॅटर आहे. हे दाखवून दिले, या देशातील न्याय आणि पोलीस यंत्रणा कधी दाखवून देईल की, देशातील अनुसूचित जाती जमाती आणि आदिवासी समाजाच्या जीवनाची किंमत आहे का? असा सवाल श्याम गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.