विद्यार्थ्यीनीकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या शिक्षकाची पुण्यात धिंड....
X
गुण वाढवून देण्याचे आमिष दाखवून विद्यार्थिनी कडे वारंवार शरीरसुखाची मागणी करणाऱ्या एका शिक्षकाची पुण्यातील रस्त्यावरून तोंडाला काळे फासत धिंड काढण्यात आली.
सदर मुलगी इयत्ता 11वी मध्ये शिकत असून तुला 12वी मध्ये गुण वाढवून देतो. असं आमिश दाखवून सदर मुलीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप मुलीच्या पालकांनी केला आहे.
दरम्यान सदर शिक्षक मुलीशी अशा प्रकारची मागणी करत असल्याची बाब मुलीने आपल्या पालकांना सांगितली. त्यांनी संबंधित शिक्षकाला काळं फासून, त्याला चोप दिला आहे.
शिक्षकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. शिक्षणाच माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात हा प्रकार घडल्यामुळे सर्व स्तरातून त्या शिक्षकाविरोधात संताप व्यक्त केला जातोय.
तर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या घटनेवरून सरकारवर टीका केली असून, कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
राज्यातील विकृती टोकाला गेली असून, अशा घटनांची राज्यात मालिकाच सुरु आहे. मात्र सत्तेत असलेल्या नेते अंतर्गत भांडणात व्यस्त असल्याचा टोला चित्रा वाघ यांनी लगावला आहे.
११ वी शिकत असलेल्या मुलीला १२वी ला मार्क वाढवून देतो व पैसे देतो फक्त तुला शारीरिक संबंध ठेवावे लागतील अशी शिक्षकाकडून विद्यार्थिनीला मागणी करण्याची संतापजनक व लज्जास्पद घटना पुण्यात घडली
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) July 14, 2021
असल्या घटनांच सत्र राज्यात सुरूहे
जनता वार्यावर आणि सत्ताधारी एकमेकांना सांभाळण्यात दंग आहेत pic.twitter.com/dTNIksLlnQ