SC/ST शिष्यवृत्तीत सुमारे 2100 कोटींचा झोल!
X
समाज कल्याण विभागातील अधिकारी आणि शिक्षण संस्थांचे संस्था चालक यांनी मिळून विद्यार्थ्यांची बोगस नावे आणि असलेल्या विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या कोर्स मध्ये खोटी नावे दाखवून सुमारे 2174 कोटी रुपयांचा अपहार केल्याचे प्रथम दर्शनी ईडी आणि SIT च्या चौकशीत निष्पन्न झाले, यावर विधानसभेत मराठा समाजाचे नेते आणि आमदार विनायकराव मेटे यांनी लक्षवेधी मांडली, त्यावर मंत्र्यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले मात्र त्यानंतरही कुठलीही कारवाई झालेली नाही याचे कारण या भ्रष्टाचारात अनेक मंत्री, राजकीय पुढारी आणि त्यांच्या नातेवाईकाच्या संस्था आहेत, अखेर हेलपिंगा हँडस फॉर स्टुडन्ट यासंस्थेला न्यायालयात धाव घ्यावी लागली आहे, काय आहे हे प्रकरण, कसा झाला भ्रष्टाचार सांगत आहेत हेलपिंगा हँडस फॉर स्टुडन्ट या संघटनेचे अध्यक्ष कुलदीप आंबेकर नक्की पहा आणि आपली प्रतिक्रिया नोंदवा