Home > Video > Republic Bharat TV ने चक्रीवादळाचे केलेले वृत्तांकन आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग करणारे-अतुल देऊळगावकर

Republic Bharat TV ने चक्रीवादळाचे केलेले वृत्तांकन आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग करणारे-अतुल देऊळगावकर

बिपरजॉय चक्रीवादळामुळे गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मात्र हे चक्रीवादळ येण्याअगोदरच बातम्यांच्या माध्यमातून रिपब्लिक भारत आणि नवभारत टाईम्ससारख्या माध्यमांनी बिभत्स पध्दतीने वृत्तांकन केले. या वृत्तांकनामुळे भीतीदायक चित्र निर्माण झाले होते. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन झाल्याचे म्हटले जाते. त्यापार्श्वभूमीवर आपत्तीमध्ये वृत्तांकन कसे करावे? याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आणि ग्रामिण विकासाचे अभ्यासक अतुल देऊळगावकर यांच्याशी मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी भरत मोहळकर यांनी संवाद साधला आहे.

Republic Bharat TV  ने चक्रीवादळाचे केलेले वृत्तांकन आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग करणारे-अतुल देऊळगावकर
X

बिपरजॉय चक्रीवादळाने गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पण हे चक्रीवादळ येण्याआधी रिपब्लिक भारत टीव्ही, नवभारत टाईम्स यांनी बिभत्सपणे वार्तांकन केले. यामध्ये स्टुडिओत छत्री घेऊन ड्रामा तयार करणे, आभासी पध्दतीने हेलिकॉप्टरमध्ये बसून वृत्तांकन करणे, याबरोबरच यावेळी फ्लोरिडातील हेरिकेन चक्रीवादळादरम्यानचा व्हिडीओ वापरून लोकांची दिशाभूल करणे, असे प्रकार घडले. यामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे अशा प्रकारे वार्तांकन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी अतुल देऊळगावकर यांनी केली.

तसेच पुढे बोलताना अतुल देऊळगावकर म्हणाले, भारतात अनेकदा वार्तांकन करण्यासाठी पत्रकारांना पाठवतांना त्यांना कुठल्याही प्रकारचे ट्रेनिंग दिलेले नसते. त्यामुळे हल्ली आपत्ती पर्यटन असल्यासारखे अनेक पत्रकार वार्तांकन करतात. मात्र पत्रकारांनी लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होणार नाही, भीती निर्माण होणार नाही, अशा पध्दतीने वार्तांकन करायला हवे, असं मत यावेळी अतुल देऊळगावकर यांनी व्यक्त केले.

ज्या पध्दतीने काही माध्यमं चुकीच्या पध्दतीने वार्तांकन करतात. ते अतिशय गंभीर आहे. त्यांच्याविरोधात आपत्ती व्यवस्थापन विभागाने कठोर कारवाई करायला पाहिजे, असं मत यावेळी अतुल देऊळगावकर यांनी व्यक्त केले.

Updated : 16 Jun 2023 8:28 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top