Home > Video > तुम्ही हनुमान चालीसा पाकिस्तानमध्ये जाऊन पठन करा- संजय राऊत

तुम्ही हनुमान चालीसा पाकिस्तानमध्ये जाऊन पठन करा- संजय राऊत

तुम्ही हनुमान चालीसा पाकिस्तानमध्ये जाऊन पठन करा- संजय राऊत
X

राज्यात भोंगे आणि हनुमान चालीसा पठन करण्यावरून वाद रंगला आहे. त्यातच संजय राऊत यांनी हनुमान चालीसावरून विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देतांना तुम्ही हनुमान चालीसा पाकिस्तानमध्ये जाऊन पठन करा, असे वक्तव्य केले आहे.

राज ठाकरे यांनी घेतलेल्या भुमिकेमुळे भोंगे आणि हनुमान चालीसा पठन करण्यावरून वाद रंगला आहे. त्यातच राणा दांपत्याने हनुमान चालीसा पठन करण्याबाबत इशारा दिला होता. त्या प्रकरणात राणा दांपत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये राणा दांपत्य सध्या जामीनावर आहे. तर राणा दांपत्य सध्या दिल्लीत आहे. अनेक नेत्यांची भेट घेत आहेत. त्यापार्श्वभुमीवर हनुमान चालीसा वाचण्यावरून संजय राऊत यांना प्रश्न विचारला होता. त्यावर संजय राऊत यांनी उत्तर दिले.

मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठन करण्याबाबत राणा दांपत्याने इशारा दिला होता. त्याप्रकरणी राणा दांपत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर यामध्ये राणा दांपत्याला 12 दिवस तुरूंगात काढावे लागले. तसेच याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता त्यांनी तुम्हाला हनुमान चालीसा पठन करायची असेल तर न्यूयॉर्कमध्ये करा, पाकिस्तानमध्ये जाऊन हनुमान चालीसा पठन करा, चंद्रावर जाऊन हनुमान चालीसा पठन करा, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.



वाराणसी येथे असलेल्या ज्ञानवापी मशीदीवरून वाद सुरू आहे. तर याप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. त्यावर प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले, जर मंदिराची गोष्ट असेल तर मी मानतो. पण त्याआधी पाकिस्तानमध्ये भारताचा एक भाग राहिला आहे. भाग भारतात परत आणा. त्या भागातील मंदिरं संकटात आहेत, बांग्लादेशमधील मंदिरं संकटात आहेत. नेपाळमध्ये हिंदू संकटात आहे. त्यामुळे अखंड भारताचे स्वप्न पाहणाऱ्यांनी आधी पाकिस्तानपासून सुरूवात करावी, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.

संजय राऊत पुढे म्हणाले की, राम मंदिर हा आमच्या अस्मितेचा विषय होता. त्याठिकाणी दोन्ही बाजूच्या लोकांच्या रक्ताच्या नद्या वाहिल्या. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय जो निकाल देईल त्या निकालाची अंमलबजावणी करायला हवी. कारण सध्या बेरोजगारी, महागाई आणि भाकरीचे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याकडे लक्ष द्यावे असे सांगत संजय राऊत यांनी ज्ञानवापी मशीदीबाबत शिवसेनेची भुमिका सौम्य असल्याचे दाखवून दिले.

Updated : 12 May 2022 2:09 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top