कोरोना व्हायरस आणि रुग्णांसोबतचे डॉक्टरांचे अनुभव
X
डॉक्टर म्हणजे लोकांचे प्राण वाचवणारा देवदूत असा उच्चार गेल्या १६ महिन्यांत अनेकदा तुमच्या कानावर पडला असेल. खरंतर कोव्हिडच्या जीवघेण्या महामारीतून डॉक्टरांनी अनेकांचे प्राण वाचविले... नवीन संशोधन करून यावर करोना प्रतिबंधात्मक लस ही उपलब्ध केली. नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी रात्रंदिवस एक करणाऱ्या डॉक्टरांना डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा...
कोरोना काळात रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टरांना त्यांचे अनुभव कसे होते? या संदर्भात मॅक्स महाराष्ट्रचे सीनिअर करसपॉन्डट किरण सोनावणे यांनी कोव्हिड रुग्णांसाठी रात्रंदिवस कार्यरत असणारे डॉ. श्रीजीत शिंदे, डॉ. माधवी पंदारे (खराडे) आणि डॉ. विलास साळवे यांची मुलाखत घेतली आहे.
दरम्यान कोव्हिड काळ हा डॉक्टर म्हणून आम्हाला ही खूप काही शिकवणारा होता. आमच्यासाठी देखील हा अतिशय भयावह असा नवा अनुभव होता. असे डॉ. माधवी पंदारे (खराडे) यांनी सांगितले.
तर डॉ. विलास साळवे म्हणाले की, रुग्ण बरा झाल्यावर त्याच्या चेहऱ्यावर येणारा आनंद हा डॉक्टरांच्या जीवनातला सर्वात मोठा आनंद असतो.
असे एकना अनेक अनुभवाचे किस्से सांगणारी मुलाखत नक्की पाहा...