Home > News Update > बुलढाणा जिल्ह्यात म्युकर माइकोसिसचे 16 रुग्ण...

बुलढाणा जिल्ह्यात म्युकर माइकोसिसचे 16 रुग्ण...

बुलढाणा जिल्ह्यात म्युकर माइकोसिसचे 16 रुग्ण...
X

Courtesy -Social media

बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना त्या पाठोपाठ आता म्युकर माइकोसिस या नव्या आजाराने तोंड वर काढले आहे. बुलढाणा जिल्ह्यात म्युकर माइकोसिस आजाराचे 16 रुग्ण आढळून आले आहे, या रुग्णांची शासकीय नोंद झाली आहे. तसेच खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्याची संख्या भरपूर असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रशांत पाटील यांनी दिली आहे.

या संदर्भात डॉक्टरांशी बातचीत केली असता, डॉ पाटील यांनी म्युकर म्युकर माइकोसिसने दोन रुग्ण दगावल्याची माहिती दिली आहे. कोविड होऊन गेलेल्यांनी काळजी घेऊन डायबटीज कंट्रोलमध्ये ठेवणे व सतत मास्क वापर करण्याच्या सूचना देत लक्षणे दिसून येत असल्याचे समजताच तात्काळ कान नाक घसा तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी यांना दाखविण्याचे आवाहन सुद्धा डॉ प्रशांत पाटील यांनी केले आहे..

Updated : 20 May 2021 12:53 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top