Home > Video > कोरोनामुळे मानसिक आरोग्य धोक्यात आलंय का?

कोरोनामुळे मानसिक आरोग्य धोक्यात आलंय का?

कोरोनामुळे मानसिक आरोग्य धोक्यात आलंय का?
X

गेल्या वर्षी कोरोना अशा भयंकर महामारीने जगाला विळखा घातला. या विळख्यातून अद्यापही जग, देश सावरतोय. कोरोनामुळे चार भिंतीत टाळेबंद झालेलं आयुष्य... हळूहळू नैराश्य, डिप्रेशन, स्ट्रेट याकडे वळू लागले आहे. परिणामी मानसिक स्वास्थ डगमगलेल्या स्थितीत पाहायला मिळत आहे. आपल्या भारतात मानसिक स्वास्थावर बोलणं म्हणजे एक प्रकारचा टॅबू मानला जातो. मानसिक आरोग्यावर भाष्य करण्याला फार महत्त्व दिलं जात नाही किंवा दिलं तर त्याला वेड्यात जमा केलं जातं.

कोरोनाच्या निमित्ताने देशात मानसिक आरोग्याचे अनेक प्रश्न समोर येताना पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे मानसिक स्वास्थ म्हणजे काय? हे जाणून घेण्याचा प्रयत्न भारतीय नागरिकांमध्ये पाहायला मिळतोय. आता तुम्ही म्हणाल कोरोना आणि मानसिक आरोग्याचा काय संबंध? कोरोना हा शारिरीक आजार असला तरी त्याचा मानसिकतेवर काय परिणाम होणार आहे? असे एक ना अनेक प्रश्न तुम्हाला पडले असावेत किंवा कामाचा प्रेशर, नैराश्यातून आपण बाहेर कसे पडावे? टाळेबंद झालेलं आयुष्य, मन, आनंदी कसे ठेवावं? याचा तुम्ही विचार करत असाल. त्यामुळे इंटरनेटचाही सर्वाधिक वापर करत असाल. मात्र, तरीही मन समाधानी आणि आनंदी नाही. या सगळ्या परिस्थितीचा आढावा मॅक्स महाराष्ट्रच्या माझं मानसिक स्वास्थ या विशेष कार्यक्रमात औद्योगिक मानसशास्त्रज्ञ डॉ. वृषाली राऊत यांनी केला आहे.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला पडलेल्या तुमच्या मनातील प्रश्न खाली दिलेल्या इमेल आयडीवर पाठवू शकतात. [email protected]दररोज सकाळी ११ वाजता 'माझं मानसिक स्वास्थ' हा विशेष कार्यक्रम पाहा फक्त मॅक्स महाराष्ट्रवर

Updated : 14 Jun 2021 3:38 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top