नवीन संसद भवनाची गरज काय? खासदार कुमार केतकर यांचा सवाल
X
केंद्रातील मोदी सरकारने २० हजार कोटींचा खर्च करुन नवीन संसद भवनाचं काम हातात घेतलं आहे. 2022 ला देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षं पूर्ण होणार आहेत. त्या दृष्टीने मोदी सरकारने नवीन संसद भवन तयार करण्याचं धोरण हाती घेतलं आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून विद्यमान संसद भवनात संसदेचं कामकाज सुरू आहे. त्यापूर्वी ब्रिटीश काळातही याच इमारतीतून देशाचा राज्यकारभार चालायचा. विद्यमान संसद भवनाला मोठा इतिहास आहे. हा इतिहास पुसण्याचं काम मोदी सरकार करत असल्याचा आरोप कॉंग्रेस खासदार कुमार केतकर यांनी केला आहे.
नवीन संसद भवन निर्मिती हा इतकाच मुद्दा नसून हा इतिहास पुसण्याचा प्रयत्न आहे. असं खासदार कुमार केतकर यांनी म्हटलं आहे. तुम्ही चांगलं बोलता... व्यंकय्या नाय़डू खासदार कुमार केतकर यांनी राज्यसभेत हा आरोप केल्यानंतर राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी कुमार केतकर यांना आपण चांगलं बोललात अशी प्रतिक्रिया दिली आहे. पाहा नक्की काय घडलं राज्यसभेत....