डिजिटल तंत्रज्ञानामुळे खासगी स्वातंत्र्य धोक्यात आलं आहे का?
X
डिजिटल तंत्रज्ञानाच्या काळात व्यक्तींच्या खाजगी आयुष्यातलं स्वातंत्र्य धोक्यात आलं आहे का? गेल्या महिन्याभरापासून डिजिटल हेरगिरीचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. पॅगासेस स्पायवेअर ने जगभरासह भारतातही गोंधळाचं वातावरण निर्माण केलं आहे. पॅगासेसच्या माध्यमातून सामान्य नागरिकांवर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप होत आहे.
जगभरातील 45 देश आपल्याच देशातील नागरिकांवरती पाळत ठेवत असल्याची चर्चा सुरु असताना आता व्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. राष्ट्रसुरक्षेसाठी राज्यसंस्थेनं सामान्य नागरिकांवर पाळत ठेवणं योग्य आहे का? सरकारच्या या डिजिटल हेरगिरीमुळे सामान्य नागरिकांचे खासगी स्वातंत्र्य धोक्यात आलं आहे का? जगभरातील सरकारच्या या धोरणांमुळे लोकांच्या Right to privacy वर गदा येतेय काय़? खासगीपणा जपण्याचा अधिकार काय आहे? पाहा श्रीरंजन आवटे यांचं विश्लेषण