Home > Video > 'स्वातंत्र्यांच्या पंच्च्याहत्तरीत देशाची गरीबीकडे वाटचाल'

'स्वातंत्र्यांच्या पंच्च्याहत्तरीत देशाची गरीबीकडे वाटचाल'

स्वातंत्र्यांच्या पंच्च्याहत्तरीत देशाची गरीबीकडे वाटचाल
X

येणाऱ्या 15 ऑगस्टला देश स्वातंत्र्य होऊन 74 वर्ष पूर्ण होऊन 75 कडे आपण वाटचाल करत आहोत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षात देश पदार्पण करत असताना देशाची अर्थव्यवस्था काय म्हणतेय? आत्तापर्यंत आलेल्या प्रत्येक सरकारने अर्थव्यवस्था उंचावण्यासाठी नेमके काय प्रयत्न केले? देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असताना माध्यमांनी आणि नवउदारमतवादी अर्थतज्ज्ञांनी GDPचा खेळ मांडला आहे का?

यासंदर्भात अर्थतज्ज्ञ अच्युत गोडबोले यांनी सखोल विश्लेषण केले आहे. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांना हात घातला. जीडीपी वाढला म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेची प्रगती झाली असं म्हणणं योग्य आहे का? कोरोना महामारी येण्यापूर्वी आणि सध्या च्या काळात अर्थव्यवस्थेपुढील प्रश्न नेमकी काय आहेत? दिवसेंदिवस दारिद्ररेषेखालील लोकांची संख्या का वाढतेय? अशा परिस्थितीत देशाच्या विकासाची निती चुकली आहे का? मनरेगावर खर्च करणं काळाची गरज आहे का? भारत आर्थिक स्वातंत्र्यांच्या यादीत नेमका कुठं आहे? आर्थिक विषमता कमी करण्यासाठी सरकारने काय प्रयत्न केले पाहिजे?

अन्य देशांच्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था कुठे आहे? भारतीय अर्थव्यवस्था ही लोकाभिमुख का नाही? यंदाच्या स्वातंत्र्य दिन साजरा करताना आपल्या आर्थिक स्वातंत्र्याची व्याख्या आणि वस्तुस्थिती समजून घेणं का आवश्यक आहे. एकंदरित देशाची परिस्थिती पाहता देशात पंचाहत्तरीत प्रवेश करताना देशाची गरिबीकडे वाटचाल सुरु झाली आहे का? यासह सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी नक्की पाहा अर्थतज्ज्ञ अच्युत गोडबोले यांचे सखोल विश्लेषण नक्की पाहा...

Updated : 12 Aug 2021 11:15 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top