VIDEO: कृष्णप्रकाश यांच्या जाळ्यात चोर कसा अडकला?
X
स्टेट बँक ऑफ इंडिया चे ए. टी. एम. मशिन गॅस कटरने कट करून त्यातील 22 लाख 95 हजार 600 रुपयाची रोख रक्कम चोरट्यांनी 10 जूनला पळवली होती. या संदर्भात भोसरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
या प्रकरणामध्ये 6 आरोपी पैकी 3 आरोपींना अटक करण्यात आली असून 3 आरोपी अद्याप फरार आहेत. त्या आरोपींचा शोध घेण्यासाठी भोसरी पोलिस स्टेशनची टीम हरियाणा मध्ये रवाना झाली होती. हे सर्व आरोपी हरियाणातील आहेत.
या सर्व प्रकरणाचा तपास पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या नेतृत्वाखील सुरु असताना अशा प्रकारच्या चोऱ्या हरियाणा व राजस्थान भागातील लोक करत असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला होता. व त्यानुसार संबंधित परिसरात वाहने आली आहेत का? याची माहिती काढली व पोलिसांचा संशय खरा ठरला.
हरियाणातील एक ट्रक घटनास्थळी आल्याचं पोलिसांना समजलं. त्या ट्रकचा नंबर RJ 09/B8093 असा होता. त्यानुसार कसून चौकशी केली असता, या सर्व आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.