फादर स्टॅन स्वामींच्या मृत्यूला शासन आणि न्यायव्यस्था जबाबदार – जयवंत हिरे
X
आदिवासींच्या, शोषितांच्या हक्कासाठी लोकशाही मार्गाने लढा देणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते फादर स्टॅन स्वामी यांचं 5 जुलै ला निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. भीमा कोरेगाव हिंसा प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली होती. स्टॅन स्वामी यांची प्रकृती खालावलेली असताना देखील त्यांना जामिन मंजूर करण्यात आला नाही. त्यांच्या निधनामुळे शासन व्यवस्था आणि न्यायव्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. यासंदर्भात मॅक्स महाराष्ट्रने सामाजिक कार्यकर्ते जयवंत हिरे यांच्याशी बातचीत केली...
जयवंत हिरे सांगतात की, भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात एल्गार परिषदेच्या निमित्ताने 16 बुद्धीजीवींना, विचारवंतांना, शोषितांसाठी लढणाऱ्यांना जाणीवपूर्वक गुंतवलं गेलं तसेच स्टॅन स्वामी यांच्या मृत्यूला शासन व्यवस्था, तपासयंत्रणा आणि न्यायव्यवस्था जबाबदार असून हा निरपराधाचा बळी घेतला गेला आहे. यावेळ न्यायव्यवस्था, तपासयंत्रणे वर त्यांनी काही प्रश्न उपस्थित केलं आहे... पाहा हा व्हिडिओ..