कोव्हिड काळात समाज आणि सरकारकडून डॉक्टरांना कोणत्या अपेक्षा ?
X
कोरोना महामारीने जगभरात थैमान घातलं आहे. १६ महिने उलटूनही कोरोना व्हायरस जायचं काही नावं घेत नाही. शिवाय तो आपल्या वेगवेगळ्या रुपाने नागरिकांना विळखा घालू लागला आहे. कोरोनाच्या या संकंटात आरोग्य यंत्रणा रात्रंदिवस कार्यरत आहेत. डॉक्टर्स दिनाच्या निमित्ताने डॉक्टरांना समाजाकडून आणि सरकारकडून काय अपेक्षा आहेत? यासंदर्भात मॅक्स महाराष्ट्रचे सीनिअर करसपॉन्डट किरण सोनावणे यांनी आयएमएचे अध्यक्ष डॉ. संतोष कदम आणि डॉ. उद्य कुलकर्णी यांच्याशी बातचीत केली आहे.
डॉ. संतोष कदम सांगतात की, गेल्या १६ महिन्यात डॉक्टरांची कामगिरी ही अत्यंत महत्त्वपूर्ण राहिलेली आहे. परंतु गेल्या ४-५ महिन्यात आपण पाहिलं तर कोरोना व्हायरसची भीती नागरिकांमध्ये कमी झाल्याचं पाहायला मिळाली. त्यात एखादा रुग्ण दगावला किंवा गंभीर झाला तर हिंसेचं वातावरण वाढल्याचं चित्र पाहायला मिळालं.
या दरम्यान अनेदका प्राणघातक हल्लाही झाला. समाजाकडून हीच अपेक्षा आहे की, त्यांनी आम्हा डॉक्टरांना देवपण न देता माणूस म्हणून ट्रीट करा. डॉक्टर हा देखील मनुष्य आहे तो देव नाही. त्यांच्या हातात रुग्णांवर उपचार करणे आहे. त्यामुळे लोकांनी त्यांना समजून घ्यावे असे आवाहन आय एम ए चे अध्यक्ष डॉ संतोष कदम यांनी केले आहे.
तर, डॉक्टर उदय कुलकर्णी म्हणाले की, सरकारने जे हॉस्पिटल चालविण्यासाठी नियम केले आहेत, ते सोपे आणि शिथिल करावे. कारण ते पाळायचे ठरवले तर हॉस्पिटल बंद करावे लागेल. त्याचबरोबर आरोग्य व्यवस्थेवर सरकारने खर्च करणे गरजेचे आहे. एकंदरित सरकार आणि समाजाकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत ? यासंदर्भात किरण सोनावणे यांनी घेतलेली सविस्तर मुलाखत नक्की पाहा...