National Doctors Day : कोरोना काळात डॉक्टरांचं मानसिक स्वास्थ काय म्हणतंय?
X
आज १ जुलै अर्थात देशाचे महान डॉक्टर बिधानचंद्र रॉय यांची पुण्यतिथी... हा दिवस राष्ट्रीय डॉक्टर दिन म्हणून देशभरात साजरा केला जातो. गेल्या दीड वर्षभरात देशातचं नव्हे तर जगभरात कोरोना महामारीने थैमान घातलं आहे. कोरोनाच्या या काळात रात्रंदिवस रुग्णांना सेवा देणाऱ्या डॉक्टरांचं मानसिक आरोग्य काय म्हणतंय? यासंदर्भात मॅक्स महाराष्ट्रने मानसशास्त्रज्ञ डॉ. वृषाली राऊत यांच्याशी बातचीत केली आहे.
डॉ. वृषाली राऊत सांगतात की, कोरोना काळात लोकांचे जीव वाचवण्यासाठी डॉक्टर्स, नर्सेस रात्रंदिवस एक करत आहेत. रुग्णांची सेवा करता-करता डॉक्टर्स त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे फार लक्ष देत नाही. वाढत्या रुग्णसंख्यामुळे त्यांच्यावर मोठ्याप्रमाणात ताण-तणाव येतो. याचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. या सगळ्या संकंटाच्या काळात डॉक्टरांमध्ये बर्न आउटचं प्रमाण सर्वाधिक वाढलं आहे. या तणाणपूर्ण काळात डॉक्टरांनी आपलं मानसिक स्वास्थ कसं आनंदी ठेवावं? यासंदर्भात पाहा डॉ. वृषाली राऊत यांचा हा व्हिडिओ...